योगनिद्रेने जीवनाची दिशा बदलेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 01:53 AM2019-11-11T01:53:27+5:302019-11-11T01:53:54+5:30
योगनिद्रा ही पूर्ण शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक विश्रांती घेण्याची पद्धती आहे. त्यामुळे योगनिद्रा करताना व्यक्ती झोपला आहे असे वाटतो, मात्र तो अंतर्गतरीत्या तो सजगतेच्या खोलवर कार्यरत असतो. अशा स्थितीत निद्रा आणि जागरण अवस्थांवर संवेदना आणि असंवेदना यांच्याशी संपर्क होत असल्याने योगनिद्रेच्या माध्यमातून मानवी जीवनाची दिशा बदलणे शक्य असल्याचे प्रतिपादन स्वामी शिवराजानंद सरस्वती यांनी केले.
नाशिक : योगनिद्रा ही पूर्ण शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक विश्रांती घेण्याची पद्धती आहे. त्यामुळे योगनिद्रा करताना व्यक्ती झोपला आहे असे वाटतो, मात्र तो अंतर्गतरीत्या तो सजगतेच्या खोलवर कार्यरत असतो. अशा स्थितीत निद्रा आणि जागरण अवस्थांवर संवेदना आणि असंवेदना यांच्याशी संपर्क होत असल्याने योगनिद्रेच्या माध्यमातून मानवी जीवनाची दिशा बदलणे शक्य असल्याचे प्रतिपादन स्वामी शिवराजानंद सरस्वती यांनी केले.
शहरात तीन दिवसापासून सुरू असलेल्या स्वत:ला वाचा योगोत्सव भारत योग यात्रा २०१९ चा रविवारी (दि.१०) योगनिद्रेच्या प्रात्यक्षिकाने समारोप करण्यात आला. योगोत्सवाच्या अखेरच्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात स्वामी शिवराजानंद सरस्वती तसेच स्वामी कैवल्यानंद सरस्वती यांनी सूर्यनमस्कार, योगा, प्राणायाम यांवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. योग शिकायचा असेल ते मुंगेर बिहार, सेवा करायची असेल तर रिखिया झारखंड येथील आश्रमास भेट देण्याचे आवाहन स्वामी शिवराजानंद सरस्वती यांनी यावेळी केले.
समाधीच्या उच्च अवस्थेपर्यंत जाण्याचा मार्ग
योगनिद्रा ही एक प्रभावशाली प्रणाली आहे ज्याद्वारे आपण चेतन रुपात शिथिल होण्यास शिकता. लोक सोफ्यावर बसून टीव्ही बघतात किंवा वृत्तपत्र वाचतात तेव्हा त्यांना वाटते की ते विश्रांती घेत आहेत, मात्र विश्रांतीची वैज्ञानिक व्याख्या फार व्यापक असून पूर्ण विश्रांतीसाठी आपण सजग असणे महत्वाचे आहे. क्रियात्मक निद्रेची अवस्था म्हणजेच योग निद्रा. योगनिद्रा, एकाग्रता आणि समाधीच्या उच्चस्तरीय अवस्थेपर्यंत जाण्याचा मार्ग प्रशस्त करीत असल्याचे स्वामी शिवराजानंद यांनी सांगितले.