‘ताई, तुम्ही लवकर बरे व्हा, चिंता बाळगू नका : उद्धव ठाकरे

By अझहर शेख | Published: February 15, 2020 11:57 PM2020-02-15T23:57:31+5:302020-02-16T00:01:08+5:30

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना निफाड तालुक्यातील लासलगावमध्ये एका बसस्थानकावर महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी (दि.१५) संध्याकाळच्या सुमारास घडली.

'You get well soon, don't worry about anything: Uddhav Thackeray | ‘ताई, तुम्ही लवकर बरे व्हा, चिंता बाळगू नका : उद्धव ठाकरे

‘ताई, तुम्ही लवकर बरे व्हा, चिंता बाळगू नका : उद्धव ठाकरे

Next
ठळक मुद्देपिडित महिला ६७ टक्के भाजली असल्याचे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले. तिच्या नातेवाईकांनी दिलेले निवेदन स्विकारले.

नाशिक : जिल्ह्यातील लासलगावमध्ये एका महिलेवर पेट्रोल टाकून पेटवून ठार मारण्याचा झालेला प्रयत्न अत्यंत निंदणीय आहे. या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.चौकशीअंती जे कोणी दोषी आढळून येतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी पिडितेला धीर देत ‘तुम्ही लवकर बरे व्हा, कुठल्याहीप्रकारची चिंता मनात बाळगू नका, डॉक्टरांकडून सर्वोतोपरी उपचार केले जात आहे, तुम्ही लवकर बरे व्हाल’असा संवाद साधला.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना निफाड तालुक्यातील लासलगावमध्ये एका बसस्थानकावर महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी (दि.१५) संध्याकाळच्या सुमारास घडली. या घटनेत पिडित महिला ६७ टक्के भाजली असल्याचे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले. घटनेची माहिती समजताच ठाकरे रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जिल्हा शासकिय रूग्णालयात पोहचले. गंभीररित्या भाजलेल्या महिलेची जळीत कक्षात जाऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी तिच्या नातेवाईकांनी दिलेले निवेदन स्विकारले. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले, लासलगावमध्ये घडलेली घटना अत्यंत निंदणीय व दुर्दैवी असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. या घटनेत प्रथमत: पिडित महिलेचा जीव वाचविण्याकरिता प्राधान्य दिले जात आहे. तसेच घटनेची सखोली चौकशीही पोलिसांकडून करण्यात येत असल्याचे ठाकरे म्हणाले.

 

 

Web Title: 'You get well soon, don't worry about anything: Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.