सोशल मीडिया वापरताना केवायसी हवीच : सचिन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 12:38 PM2021-02-12T12:38:55+5:302021-02-12T12:39:41+5:30

ओझर : सायबर गुन्हेगार हे सामान्य नागरिकांच्या भावनांशी खेळ करतात. सोशल मीडिया फोफावत चालले असताना त्यातून अनेकांची होणारी फसवणूक लक्षात घेता त्याला सुद्धा केवायसीची तितकीच गरज असून त्यामुळे खोट्या नावाचा वापर करून हॅकिंग व फसवणुक करणाऱ्यांना आळा बसेल. तसेच भविष्यात होणारा मोठा दुष्परिणाम टाळता येईल असे प्रतिपादन नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले.

You need KYC when using social media: Sachin Patil | सोशल मीडिया वापरताना केवायसी हवीच : सचिन पाटील

सोशल मीडिया वापरताना केवायसी हवीच : सचिन पाटील

Next

ओझर : सायबर गुन्हेगार हे सामान्य नागरिकांच्या भावनांशी खेळ करतात. सोशल मीडिया फोफावत चालले असताना त्यातून अनेकांची होणारी फसवणूक लक्षात घेता त्याला सुद्धा केवायसीची तितकीच गरज असून त्यामुळे खोट्या नावाचा वापर करून हॅकिंग व फसवणुक करणाऱ्यांना आळा बसेल. तसेच भविष्यात होणारा मोठा दुष्परिणाम टाळता येईल असे प्रतिपादन नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले.
नाशिक बार असोसिएशनच्या वतीने सायबर क्राईम बाबत विविध प्रकार आणि प्रसार बाबत आयोजित चर्चा सत्रात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला अध्यक्ष ॲड नितीन ठाकरे यांनी पाटील यांचे स्वागत केले.प्रस्ताविक ऍड.जालिंदर ताडगे यांनी केले. सचिन पाटील यांनी वाढत्या ऑनलाइन वापरामुळे दररोज ऑनलाइन गुन्हे आणि फसवणूकीबाबत विविध मुद्यांवर प्रकाश टाकत माहिती दिली.
देवाने जरी विचारला तरी फोन वर आपला पिन नंबर द्यायचा नाही. येणाऱ्या काळात प्रगत तंत्रज्ञान विकसित होऊन गाड्या व इतर उपकरणं सुद्धा इंटरनेट वर चालणार आहे. त्यादृष्टीनं भविष्यातील धोके आताच लक्षात घेऊन सतर्क राहा. फिजिकल बॅरीयर्स भविष्यात राहणार नाही. गुन्हेगार हे सायकॉलॉजीतील अत्यन्त हुशार असतात. विविध ऍप्लिकेशन डाउनलोड करताना वापरकर्त्याने हुशारीने राहून परवानगी द्यायची. मॅट्रिमोनिअल फ्रॉड देखील मोठ्या प्रमाणात फोफावत चालले आहे.त्यामुळे सर्वांनीच सतर्कता बाळगून इंटरनेट गुन्ह्यातून अलिप्त राहण्याचे देखील त्यांनी सांगितले.भविष्यात घडणारे सायबर गुन्हे हे अनेक पटींनी वाढणार असून त्यामुळे ऑनलाइन बाबतीत अनेक विषयांवर सखोल माहिती त्यांनी दिली.
यावेळी नवीन सनद घेतलेल्या वकिलांचे स्वागत करण्यात आले व त्यांना साहित्य वाटप करण्यात आले.याप्रसंगी शहर जिल्ह्यातून दोनशे वकील सहभागी झाले होते.यावेळी जयंत जायभावे,शरद गायधनी,संजय गीते,अविनाश भिडे,सोनल कदम,कमलेश पाळेकर,महेश लोहिते,शरद मोगल,हर्षल केंगे आदींसह वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
------------------
ऑनलाइन काय काळजी घ्यावी:
कोणत्याही प्रकारची ऑनलाइन फसवणूक झाल्याक्षणी त्वरित बँकेत जाऊन तक्रार पोलीस ठाणे गाठून त्याची प्रत द्यायची शिवाय सायबर पोलीस, स्थानिक पोलीस ठाणे,पोलीस अधीक्षक कार्यालयाला प्रत मेल करावी. सर्वच प्रकारचे पिन सतत बदलत राहणे, ज्या वेबसाईट वरून बँकेचे व्यवहार करतात ते सुरक्षित आहे का याची खातरजमा होणे गरजेचे आहे. वैयक्तिक वायफाय वापरताना सर्वांना ऍक्सेस होईल असे करु नये.
------------------
राज्यात पहिलाच उपक्रम:
पोलीस आणि वकील संघ यांनी एकत्र येऊन प्रगत होणाऱ्या इंटरनेटमुळे त्याचे होणारे परिणाम यावर जनजागृती केली. पाटील यांनी देखील भारतातील मुख्य सायबर घटना व त्याचा केलेला पर्दाफाश याचे अनेक दाखले देत सतर्कता कशी बाळगावी यावर भाष्य केले.त्यामुळे नवोदित वकिलांना त्यांच्या करिअर मध्ये येणाऱ्या अडचणींसाठी सदर सत्र उपयोगी राहील असा विश्वास वकील संघाने व्यक्त केला.

Web Title: You need KYC when using social media: Sachin Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक