व्हिडिओ स्टेटस ठेवत युवा शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2022 11:01 PM2022-03-27T23:01:48+5:302022-03-27T23:03:41+5:30

दिंडोरी : तालुक्यातील पाडे येथील युवा शेतकऱ्याने बँकेच्या कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली.

Young farmer commits suicide by keeping video status | व्हिडिओ स्टेटस ठेवत युवा शेतकऱ्याची आत्महत्या

संदीप भुसाळ

Next
ठळक मुद्देदिंडोरी : बँकेच्या तगाद्याला कंटाळून घेतली टोकाची भूमिका

दिंडोरी : तालुक्यातील पाडे येथील युवा शेतकऱ्याने बँकेच्या कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली.

पाडे शिवारातील सिग्राम कंपनीलगत शेत असलेल्या संदीप राजेंद्र भुसाळ (२४) या शेतकऱ्याने एका राष्ट्रीयीकृत बँकेकडून घेतलेल्या कर्ज वसुलीच्या तगाद्यामुळे आपल्या शेतालगत असलेल्या आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास निदर्शनास आली. या घटनेबाबत मयताचा मावसभाऊ ज्ञानेश्वर संजय शिंदे (रा. वलखेड) यांनी घटनेबाबत दिंडोरी पोलिसांना खबर दिली. त्यांनी असे सांगितले की, माझा मावस भाऊ संदीप राजेंद्र भुसाळ ( रा. पाडे) हा आपली आई, भाऊ व आजी यांच्यासोबत राहतो व शेती करतो. त्याने शेती व्यवसायासाठी पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घेतले होते; परंतु गेल्या तीन वर्षांपासून कोरोना परिस्थिती व शेतीतील कमी उत्पन्नामुळे बँकेचे कर्ज भरू शकला नाही. बँकेने गेल्या सहा महिन्यापासून कर्ज वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात तगादा लावल्याने नैराश्यातून पाडे शिवारातील त्यांच्या राहत्या घराच्या मागील आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या मोबाइलमध्ये याबाबतचे स्टेटस ठेवले. आपण कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहोत. या घटनेप्रकरणी दिंडोरी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस करीत आहेत.

पाडे येथील युवा शेतकरी आत्महत्या घटनेबाबतचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून, सविस्तर अहवाल लवकर तयार करून वरिष्ठ कार्यालयास पाठविला जाणार आहे.
- पंकज पवार, तहसीलदार, दिंडोरी 

Web Title: Young farmer commits suicide by keeping video status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.