वडिलांच्या कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:46 AM2018-03-20T01:46:42+5:302018-03-20T01:46:42+5:30

एकत्रित कुटुंबातील वयोवृद्ध वडिलांच्या कर्जाला कंटाळून दहीवड (ता. देवळा) येथील तरु ण शेतकºयाने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Young farmer suicides due to father's debt | वडिलांच्या कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

वडिलांच्या कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Next

खर्डे : एकत्रित कुटुंबातील वयोवृद्ध वडिलांच्या कर्जाला कंटाळून दहीवड (ता. देवळा) येथील तरु ण शेतकºयाने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत मालेगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दहीवड येथील शरद त्रंबक अहिरराव हा तरु ण शेतकरी आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांसह मतिमंद भाऊ व पत्नी, मुलगा व दोन मुलींसह शेती व्यवसाय करीत होता. वडीलांच्या नावावर देना बँकेचे साडेतीन लाख रु पयांचे कर्ज व डाळिंबाला मिळत असलेला कवडीमोल बाजारभाव यामुळे वैफल्यग्रस्त अवस्थेत असलेल्या शरद अहीरराव याने स्वत:च्या डाळिंबाच्या क्षेत्रात शनिवारी (दि.१७) रोजी सायंकाळच्या सुमारास विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.  त्याला तात्काळ कुटुंबीयांनी व जवळच्या नागरीकांच्या मदतीने मालेगाव येथे खाजगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र रविवारी ( दि. १८) रोजी रात्री उपचारादरम्यान शरद अहीरराव याचे निधन झाले. मयत शरद अहीरराव यांच्या नावावर दहीवड येथे शेतजमीन असून वडीलांच्या नावावर देवळा येथील देना बँकेच्या शाखेत साडेतीन लाख रु पयांचे कर्ज आहे.  दि. १५ फेब्रुवारी २०१५ पासून असलेल्या कर्जाची गेल्या दोन वर्षांपासून डाळिंबाला कवडीमोल भाव मिळत असल्याने परतफेड करता आली नव्हती. त्यामुळे वैफल्यग्रस्त अवस्थेत असलेल्या शरदने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शरद अहीरराव याच्या पाश्च्यात वयोवृद्ध आई -वडील , मतिमंद भाऊ, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. शरद अहीरराव यांच्यावर सोमवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान दहीवड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान देवळा येथील महसूल विभागाचे मंडळ निरीक्षक बी. व्ही.अहीरराव, तलाठी के.पी. जयस्वाल यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
जायगाव शिवारात एकाची आत्महत्या
नायगाव : सिन्नर तालुक्यातील वडझिरे (धाबे मळा ) येथील काळू चंद्रभान गायकवाड ( ४१ ) यांनी जायगाव शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. जायगाव शिवारात सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास येथील शेतकरी संतोष दिघोळे हे शेतात जात असतांना त्यांना मोठ्या पाझर तलाव परिसरातील गायरानातील गट.नंबर १९२ मधील सागाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दिसला. आजुबाजुच्या लोकांना सदर घटनेची खबर मिळताच वडझीरे येथील धाबेमळा येथील काळू गायकवाड यांचा असल्याचे समजले. जायगाव येथे नातेवाईकांकडे यात्रेसाठी आलेल्या पत्नीला भेटण्यासाठी ते रविवारी आले असल्याचे समजते. सदर घटनेची माहिती जायगावचे पोलीस पाटील भिकाजी गिते यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करत आकस्मीक मृत्यूची नोंद केली. सिन्नर येथील नगरपालिकेच्या दवाखान्यात शिवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. गायकवाड यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुलगे,एक मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Young farmer suicides due to father's debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.