‘देवराई’ला प्रतीक्षा तरुण हातांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:29 AM2018-03-25T00:29:03+5:302018-03-25T00:29:03+5:30

नाशिकच्या ‘देवराई’द्वारे हरित भविष्य साकारण्यासाठी ५ जून २०१५ रोजी हजारो आबालवृद्ध नाशिककर सातपूर येथील वनविभागाच्या जागेवर (फाशीचा डोंगर) आपलं पर्यावरण संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकत्र आले होते. वनमहोत्सवातून त्यावेळी तब्बल ११ हजार रोपांची लागवड झाली. तीन वर्षांत रोपांचीही चांगली वाढ झाली असून, किमान पुढील दोन वर्षे तरी नाशिककरांना रोपांच्या संवर्धनाची काळजी घ्यावीच लागणार आहे. मार्चचा अखेरचा आठवडा सुरू असून, सूर्य तळपू लागल्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे.

Young hands waiting for 'Deewari' | ‘देवराई’ला प्रतीक्षा तरुण हातांची

‘देवराई’ला प्रतीक्षा तरुण हातांची

Next

नाशिक : नाशिकच्या ‘देवराई’द्वारे हरित भविष्य साकारण्यासाठी ५ जून २०१५ रोजी हजारो आबालवृद्ध नाशिककर सातपूर येथील वनविभागाच्या जागेवर (फाशीचा डोंगर) आपलं पर्यावरण संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकत्र आले होते. वनमहोत्सवातून त्यावेळी तब्बल ११ हजार रोपांची लागवड झाली. तीन वर्षांत रोपांचीही चांगली वाढ झाली असून, किमान पुढील दोन वर्षे तरी नाशिककरांना रोपांच्या संवर्धनाची काळजी घ्यावीच लागणार आहे. मार्चचा अखेरचा आठवडा सुरू असून, सूर्य तळपू लागल्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे. देवराईला तरुण हातांची प्रतीक्षा कायम असून, दर रविवारी तरुणाईने देवराईकडे पाऊ ल वळवून हरित नाशिकसाठी हातभार लावण्याचा प्रयत्न क रणे आवश्यक आहे. वनविभाग व आपलं पर्यावरण संस्थेने संयुक्तरीत्या ३४ महिन्यांपूर्वी वनमहोत्सव राबविला. या वनमहोत्सवाला नाशिककरांचा मिळालेला अभूतपूर्व प्रतिसादामुळे दहा हजार रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होऊन एक हजार अतिरिक्त रोपे लावण्यात आली. नाशिककरांनी एकाच दिवशी ११ हजार रोपांची लागवड यशस्वीपणे करून दाखविल्याने हा ‘नाशिक पॅटर्न’ शासनाचा लक्षवेधी ठरला. ‘देवराई’निर्मितीचा पॅटर्न राज्यभर राबविण्याचे धोरण वन मंत्रालयाने घेत ५० कोटी झाडे लागवडीचा संकल्प सोडला. आपलं पर्यावरण संस्थेकडून तीन वर्षांपासून येथील रोपट्यांचे संगोपन-संवर्धन करण्याचे काम अविरतपणे सुरू आहे; मात्र काही स्वयंसेवक उच्च शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने शहराबाहेर स्थायिक झाल्याने मनुष्यबळ तोकडे पडू लागले आहे. वनविभाग, वनविकास महामंडळ, सामाजिक वनीकरण विभागाकडूनही आठवड्यातून एक दिवस तरी या ठिकाणी वनमजुरांना पाचारण करण्याची मागणी होत आहे.
बोटावर मोजण्याइतक्या स्वयंसेवकांची धडपड
बोटावर मोजण्याइतके स्वयंसेवक वीकेण्डला येथे चार ते पाच तास श्रमदान करून जगलेल्या रोपांना वाढविण्याचा कसोशीने प्रयत्न क रत आहेत. महाविद्यालयीन तरुणांचे ग्रुप व विविध शाळा-महाविद्यालयांमधील राष्टÑीय सेवा योजना, हरित सेना, स्काउट-गाइड दलाचे विद्यार्थ्यांनी दर शनिवार, रविवारी देवराईला भेट देऊन श्रमदान के ल्यास येथील हजारो रोपांची अधिक वेगाने वाढ होण्यास मदत होईल. मार्च अंतिम टप्प्यात आला असून, पुढील दोन महिने प्रखर ऊन पडणार असून तपमानात वाढ होणार आहे. त्यामुळे आता रोपांना पाणी देण्याची गरज अधिक वाढली आहे; कारण सूर्य तळपू लागला असून, उन्हाची तीव्रता वाढत आहे.
१०१ भारतीय प्रजातींची रोपे
तीन वर्षांमध्ये येथे लावण्यात आलेल्या तब्बल १०१ भारतीय प्रजातींच्या रोपांची दर्जेदार वाढ होत आहे. बहुतांश रोपांचे लहान झाडांमध्ये रूपांतर झाले आहे. या ठिकाणी लावण्यात आलेल्या रोपांमध्ये दुर्मीळ भारतीय प्रजातीच्या रोपांचा समावेश आहे. केवळ हरित वाळवंटाची निर्मिती होऊ वृक्ष लागवडीतून होऊ नये, हा यामागील मुख्य हेतू संस्थेने डोळ्यापुढे ठेवला आहे. नैसर्गिक जैवविविधतेला हातभार लावणाऱ्या पर्यावरणपूरक रोपांना या ठिकाणी स्थान देण्यात आले आहे.

Web Title: Young hands waiting for 'Deewari'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल