वीज कोसळून आंबेवाडीत तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 01:33 AM2018-06-04T01:33:40+5:302018-06-04T01:33:40+5:30
नाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात बदलेल्या मान्सूनपूर्व वातावरणामुळे वादळी वारा, वीज कोसळून घडलेल्या दुर्घटनेत इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथील दशरथ धोंडू ढवळे हा २७ वर्षांचा तरुण जागीच ठार झाला. जिल्ह्यातील अन्य भागात वादळी पावसामुळे पोल्ट्री फार्म, जनावरांचे गोठे, घरांचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले, शिवाय ठिकठिकाणी वीज कोसळण्याची घटना घडल्याने जनावरे दगावली आहेत. प्रशासनाने महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, त्यानंतर नुकसानीचा अंदाज बांधता येणार आहे.

शुक्रवारी दुपारनंतर सिन्नर, वावी, येवला तालुक्यात पावसाने धूळधाण उडवली. वादळी वारा व विजेचा कडकडाट करीत कोसळलेल्या पावसाने मोठे नुकसान केले. सिन्नर तालुक्यातील शहा येथे ३२ घरांची पडझड होऊन ग्रामपंचायतीचे सभागृहाचे तसेच दोन कांदा चाळीचे शेड उडून गेले.
देवपूर येथे २१ घरांची किरकोळ पडझड झाली व वीज कोसळून एक बैल व दोन वासरू मयत झाले. चार पोल्ट्री शेड जोरदार वादळात जमीनदोस्त झाले. वावी येथेही २६ घरांची किरकोळ पडझड तर नांदूरशिंगोटे येथे २२ घरांची पडझड व ४ कांदा चाळीचे नुकसान झाले. पांढुर्ली येथे १५ घरे व १४ गोठ्यांची पडझड तर ७ शेडनेटचे नुकसान झाले. सिन्नर तालुक्यात शनिवारी दुसºया दिवशीही पाऊस व वादळी वाºयाने धुळवड येथील ७ ते ८ घरांचे नुकसान झाले तसेच निवृत्ती रामनाथ आव्हाड यांचे घर कोसळून घरातील चार व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारार्थ संगमनेर येथे दाखल करण्यात आले आहे. बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथे वीज पडून शेतात बांधून ठेवलेला गोºहा मयत झाला तर रातीर येथे पाचटाचे झाप असलेल्या घरावर वीज कोसळून घराला आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कळवण तालुक्यातील देवळी वणी आणि बिलवाडी गावात वादळी वाºयाने १० ते १५ घरांचे नुकसान झाले तसेच गावातील विजेचा खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. निफाड तालुक्यातील सोनगाव येथे वीज पडून शिवनाथ त्र्यंबक गावले यांची गाय मयत झाली तर वाकद येथे सखूबाई ज्ञानदेव गागरे यांचे पोल्ट्रीचे शेड वादळी वाºयात उडून गेले.
(जोड आहे)
जवान ठार
इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी शिवारात विजेचा कडकडाट करीत पावसाने हजेरी लावली. घराकडे परतणारा दशरथ धोंडू ढवळे (२७) हा तरुण झाडाखाली उभा असताना अंगावर वीज कोसळून तो जागीच ठार झाला. मयत दशरथ हा मुंबई महापालिकेच्या अग्रिशामक दलात नोकरीस होता. सुटीनिमित्त तो गावी परतला होता. त्याच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.