विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 10:44 PM2022-01-20T22:44:45+5:302022-01-20T22:46:45+5:30
सिन्नर: तालुक्यातील आटकवडे शिवारात रोहित्रावर विजेचा धक्का बसल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी सिन्नरच्या आडवा फाटा येथील वितरण कार्यालयावर मोर्चा काढत निषेध नोंदवला. यावेळी शेतकऱ्यांनी तरुणाचा मृतदेह वीज वितरण कार्यालयावर नेण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

शेतीच्या थकीत वीजबिलामुळे वीज वितरणकडून आटकवडे शिवारात आज रोहित्राचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू होती. वीज वितरणच्या कारवाईची कुठलीही कल्पना नसल्याने सुनील दत्तू वाघ (२२) काम करीत होता. त्यावेळी विजेचा धक्का लागून सुनील जागीच गतप्राण झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी वाहने भरून येत आडव्या फाट्यावरील वीज वितरणच्या कार्यालयावर आपला मोर्चा नेला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे स्वत: कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेऊन कार्यालयावर पोहचले. शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेत त्यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या घटनेला जो कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर संतप्त शेतकरी शांत झाले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांकडे सुपुर्द करण्यात आला. रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत सुनीलच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.