घोरवड घाटात अपघातात तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:14 AM2021-01-21T04:14:12+5:302021-01-21T04:14:12+5:30
--------------------- चास येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग सिन्नर : तालुक्यातील चास येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित तरुणाविरोधात वावी पोलीस ...
---------------------
चास येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग
सिन्नर : तालुक्यातील चास येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित तरुणाविरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश तुकाराम भाबड (रा. चास) असे संशयिताचे नाव आहे. दुपारी दोनच्या सुमारास संशयित युवक आला व त्याने विनयभंग केला, अशी तक्रार वावी पोलिसांत दिली आहे.
------------------
बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार
सिन्नर : तालुक्यातील वडांगळी-कीर्तांगळी शिवारामध्ये कडवा कॅनॉलच्या चारी नंबर ३२ लगत राधाकृष्ण शिरोळे या शेतकऱ्याची कालवड रात्री ११ वाजेच्या दरम्यान बिबट्याने ठार केली. वेळीच आरडाओरडा केल्याने बिबट्याने उसाच्या शेतात धूम ठोकली; परंतु तोपर्यंत कालवड मृत्युमुखी पडली होती. वडांगळी-तारु खेडले रोड परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून तीन बिबटे अनेक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले असून, परिसर भयभीत झाला आहे. वनविभागाने ताबडतोब या परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
------------------
पाणी उकळून पिण्याचे पालिकेचे आवाहन
सिन्नर : सिन्नर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा नदीवरील चेहडी येथील बंधाऱ्यातील पाण्यात टी.डी.एस., शेवाळ व इतर जैविक घटकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहर व उपनगरवासीयांनी पुढील पाच ते सहा दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार यांनी केले आहे. शहरात सध्या नळांद्वारे येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची चव बदलली असल्याची व वेगळा दर्प येत असल्याच्या तक्रारी नगरपरिषदेकडे येत आहेत.