बिबट्याच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 02:50 PM2019-07-16T14:50:13+5:302019-07-16T14:50:31+5:30
कळवण - तालुक्यातील बारीचापाडा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गुरे चारण्यासाठी डोंगरावर गेलेला युवक गंभीर झाला असुन कान व पायाला दुखापत झाल्याने जखमी युवकास नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कळवण - तालुक्यातील बारीचापाडा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गुरे चारण्यासाठी डोंगरावर गेलेला युवक गंभीर झाला असुन कान व पायाला दुखापत झाल्याने जखमी युवकास नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
विसापुर येथील पिंटु तुळशीराम पवार (३५) हा युवक आपली गुरे चारण्यासाठी चाचेर शिवारातील बारीपाडा जवळील डोंगरावर गेला होता.गुरे चारत असतांना दुपारी तीन वाजेच्या सुमारास बिबट्याने पाठीमागुन हल्ला करत कानाला चावा घेतला.बिबट्याशी झालेल्या झटापटीत पवार डोंगरउतारावरु न खाली कोसळल्याने त्यांच्या उजव्या पायालाही दुखापत झाली. उजवा पाय घोट्यापासून बाहेर आला असुन उजवा कान फाटल्याने पवार रक्तबंबाळ झाले.त्यांच्यासोबत थोड्या अंतरावर असलेल्या युवकाने परिसरातील ग्रामस्थांना बिबट्याने हल्ला केल्याची माहीती दिल्यानंतर ग्रामस्थांनी पवार याला कळवण उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले.या हल्ल्यात पवार गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर कळवण उपजिल्हा रु ग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रशांत खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रविण बागुल यांनी प्राथमिक उपचार प्रकृती गंभीर असल्याने नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलवले.वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.बी.पाटील, शशिकांत वाघ यांनी उपजिल्हा रु ग्णालयात जखमी पवार यांची भेट घेवुन माहिती घेतली व वनविभागाच्या वतीने मदतीचे आश्वासन दिले.