युवतीवर हल्ला करणारा तरुण अद्याप मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 00:32 IST2019-10-11T23:43:47+5:302019-10-12T00:32:51+5:30
लासलगाव येथील बारावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर घरात घुसून चाकूने तब्बल अठरा प्राणघातक वार करणाºया युवकाला गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळूनदेखील लासलगावचे पोलीस अधिकारी अटक करीत नसल्याने पोलिसांच्या ढिम्मपणाची लेखी तक्र ार पीडित विद्यार्थिनीच्या आईने थेट नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक आरती सिंह यांच्याकडे केली आहे

युवतीवर हल्ला करणारा तरुण अद्याप मोकाट
लासलगाव : येथील बारावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर घरात घुसून चाकूने तब्बल अठरा प्राणघातक वार करणाºया युवकाला गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळूनदेखील लासलगावचे पोलीस अधिकारी अटक करीत नसल्याने पोलिसांच्या ढिम्मपणाची लेखी
तक्र ार पीडित विद्यार्थिनीच्या आईने थेट नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक आरती सिंह यांच्याकडे केली आहे. गेल्या काही दिवसांपासून लासलगाव पोलीस कार्यालयाची सूत्रे स्वीकारणारे सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांना विचारले असता प्राणघातक हल्ला करणाºया युवकाच्या मागावर गृहरक्षक दलाचे जवान लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.
लासलगाव शहरात एकतर्फी प्रेमातून घरात घुसून अल्पवयीन युवतीवर टाकळी विंचूर येथील अतिश ढगे या युवकाने धारदार चाकूने वार करून स्वत:वरही वार करून घेतले होते. या खुनी हल्ल्यात अल्पवयीन युवती गंभीर जखमी झाली होती व हा युवक किरकोळ जखमी झाला होता. या दोघांनाही नाशिक येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदर अल्पवयीन युवतीची घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने लासलगाव शहरातील युवावर्गाने एकत्र येत व लोकसहभागातून वर्गणी काढत तिच्यावर तब्बल पंधरा ते वीस दिवस उपचार करून तिला वाचविण्यात यश मिळाले होते.
किरकोळ जखमी असलेला आतिश ढगे यास नाशिक येथे खासगी उपचारानंतर सोडून देण्यात आले; मात्र त्यानंतरही लासलगाव पोलिसांनी सदर संशयितास अद्याप ताब्यात घेतलेले नाही. लासलगाव पोलिसांना या गोष्टीचे गांभीर्य राहिले नसल्याचा आरोप करीत पीडित युवतीच्या आईने पोलीस अधीक्षक आरती सिंह यांच्याकडे आपले गाºहाणे लेखी स्वरूपात मांडले आहे. लासलगाव पोलीस आरोपीस पाठीशी घालत असल्याचे तक्र ारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलीस होमगार्डच्या भरोशावर
दीड महिन्यापूर्वी ही घटना लासलगाव शहरात घडली, त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून सदर संशयिताला सोडून दिलेले आहे. त्यानंतरही लासलगाव पोलिसांनी त्यास ताब्यात घेतलेले नाही. यासंदर्भात पोलिसांना विचारणा केली असता त्यांनी सदर संशयितांवर होमगार्ड देखरेख ठेवत असल्याचे अनोखे उत्तर दिले. पोलीस संख्या योग्य प्रमाणात असतानाही होमगार्डच्या भरोशावर लासलगाव पोलीस आहे का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.