पोहण्यासाठी उतरलेल्या तरु णाचा डोहात बूडुन मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 00:37 IST2020-08-02T22:23:14+5:302020-08-03T00:37:13+5:30
नांदगाव : तालुक्यातील कासारी घाटाजवळील चांदेश्वरी धबधब्याजवळ असलेल्या डोहात पोहण्यासाठी उतरलेल्या तरु णाचा डुबून मृत्यू झाला.

किशोर बारगळ
नांदगाव : तालुक्यातील कासारी घाटाजवळील चांदेश्वरी धबधब्याजवळ असलेल्या डोहात पोहण्यासाठी उतरलेल्या तरु णाचा बूडुन मृत्यू झाला.
किशोर बारगळ असे मयताचे नाव असूनतो वैजापूर तालुक्यातील पोखरी येथील रहिवाशी आहे. कासारी घाटात चांदेश्वरीचा धबधबा पर्यटकांना नेहमीच आकर्षणाचा विषय असतो श्रवण महिन्यात विशेषत: मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते वैजापूर तालुक्यातील पोखरी येथील किशोर दादासाहेब बारगळ (३०) हा आपल्या चार सहकाऱ्यांसह शनिवारी (दि.१) श्री क्षेत्र नस्तनपूर येथे गेले तेथून ते चांदेश्वरी धबधब्या या ठिकाणी पर्यटनासाठी आले होते. किशोर आपल्या अन्य मित्रांसह धबधब्याच्या खालील भागात पोहण्यासाठी उतरला, मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे दोघे पाण्यात बुडू लागले, मात्र त्यातील एकाला वाचविण्यात यश आले, तर किशोर काही बाहेर येऊ शकला नव्हता. त्याला शोधण्याचा बराच प्रयत्र केला मात्र तो सापडला नाही.
दरम्यान धबधब्याजवळ खोलगट भागातील कोपरीत अडकून पडलेला किशोरचा मृतदेह रविवारी (दि.२) दुपारी दीड वाजेच्या सुमारास चांदोरी येथील रेसेक्यु पथकाच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. किशोर हा विवाहित असून पत्नी व साडेतीन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. वैजापूर तालुक्यातील पोखरी गावात त्याचा मंडप व्यवसाय आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नांदगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली