गावगाड्याच्या राजकारणाची तरुणांना क्रेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 06:10 PM2020-12-19T18:10:06+5:302020-12-19T18:10:26+5:30

सायखेडा : निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायत निवडुकीचे बिगुल वाजले असून आचारसंहिता लागू झाली आहे. प्रशासकीय कामकाज सुरु झाले आहे.

Young people craze for village politics | गावगाड्याच्या राजकारणाची तरुणांना क्रेज

गावगाड्याच्या राजकारणाची तरुणांना क्रेज

Next
ठळक मुद्देपुढाऱ्यांची कसब पणाला : निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न हवेत

सायखेडा : निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायत निवडुकीचे बिगुल वाजले असून आचारसंहिता लागू झाली आहे. प्रशासकीय कामकाज सुरु झाले आहे.

गावगाड्याच्या निवडणुकीत यंदा तरुणांची वाढती क्रेज पाहता निवडणुका रंगतदार होण्याची शक्यता आहे, मात्र कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे विस्कटलेली आर्थिक घडी लक्षात घेता निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचं आहे, मात्र तरुणाचा वाढता सहभाग आणि पक्षीय राजकारण यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचा जोरदार धुरळाधुरळा उडणार असल्याचे चित्र निर्माण होत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ग्रामपंचायत ही ग्रामविकासाचा कणा मानला जातो अलीकडे १४ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतला मोठया प्रमाणात निधी उपलब्ध होतो. शिवाय इतर विकास योजनेअंतर्गत लाखो रुपये येतात असतात त्यामुळे स्थानिक विकास योजनेत सरपंचपदाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे तरुण आकर्षित झाले असून जुन्या गाव पुढाऱ्यांना दूर सारून तरुण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे चित्र गावागावात दिसत आहे.
निवडणुका झाल्या खर्चिक
विधानसभा व लोकसभा निवडणुकीतील वाढता खर्च आत्ता ग्रामपंचायत निवडणुकीत जाचक ठरणार आहे. तालुक्यातील निवडणुकीतील कोटींच्या उलाढालीमुळे कार्यकर्त्याना लागलेली सवय आणि मतदारांचा वाढता खर्च ग्रामपंचायत निवडुकीत महाग ठरणार आहे.
काही ग्रामपंचायतमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडुकीला लाजवेल इतका खर्च केला जातो सदस्य होण्यासाठी दहा लाख रुपये खर्च झाल्याची चर्चा निवडणुकी नंतर रंगलेली आहे त्यामुळे यंदाच्या निवडुकीत वारेमाप खर्च आणि उधळ पट्टी होणार आहे
कोरोनामुळे आर्थिक संकट
ग्रामीण भागाचा विचार केला असता निफाड तालुका कोरोणाचा हॉस्पॉट ठरला होता यामुळे अनेक तरुण बेरोजगार झाले आणि व्यवसाय मोडकळीला आले. त्यामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे. ग्रामपंचायत स्तरावर अद्यापही करांच्या वसुलीला वेग आला नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा फटका निवडणुकीत पाहायला असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
निवडणुका बिनविरोधसाठी प्रयत्न व्हावे
ग्रामपंचायतीचे सरपंचपद मिळवण्यासाठी अनेकदा आटापिटा केला जातो. सदस्यांची गोळाबेरीज करताना लाखो रुपये खर्च होतो. ग्रामीण विकासाचे सर्वोच्च मानाचे पद आरक्षित असल्यास उपसरपंच गावाचा गाडा हाकताना दिसतात. अनेक ठिकाणी सरपंच सदस्यांना विश्वासात न घेता कामकाजाचा गाव गाडा हाकतात. त्यामुळे गावातील निवडणूक विश्वासात घेऊन बिनविरोध होण्याची गरज आहे.


पुढाऱ्यांचा वाढता हस्तक्षेप...
ज्या पक्षाकडे सर्वाधिक ग्रामपंचायती ताब्यात असतात अशा पक्षाला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या काळात अधिक बळ मिळत असते. यामुळे तालुक्यातील पक्षीय पुढार्‍यांनी अलीकडे ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घातल्याने निवडणुका चुरशीचा होत असतात अनेक ठिकाणी रसद देखील पुरवली जाते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तालुक्यातील पुढाऱ्यांचा हस्तक्षेप कमी व्हावा अशी मागणी होत आहे.

अनेक ग्रामपंचायत निवडणुका पहात आलो आहे .अलीकडील काळातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या आणि खर्चिक होत आहे. त्यामुळे गावातील लाखो रुपये खर्च वाया जातो. गावातील जाणकारांनी पुढे येऊन निवडणुका बिनविरोध करणे काळाची गरज आहे.
- राजेंद्र मोगल, माजी सभापती, जिल्हा परिषद, नाशिक.

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावातील गावकी, भावकी आणि पक्षीय राजकारण या गोष्टी अडसर ठरतात. परंतु विकासाचा विचार करता तरुणांनी एकत्र निवडणुका बिनविरोध करणे काळाची गरज आहे
- भाऊसाहेब कमानकर, माजी उपसरपंच, भेंडाळी.

गेल्या काही वर्षापासून ग्रामपंचायत निवडणुकामध्ये खर्च करण्याची स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेतून विरोधक तयार होत आहे. इर्षा आणि संघर्ष यातून कौटुंबिक कलह निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळते, त्यामुळे निवडणुका बिनविरोध काळाची गरज आहे.
- धोंडीराम रायते, उपसरपंच, शिंगवे.

Web Title: Young people craze for village politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.