महापुरु षांच्या विचारांचा वारसा तरु णांनी चालवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 06:35 PM2019-01-01T18:35:34+5:302019-01-01T18:36:00+5:30
महापुरु षांना विशिष्ट धर्मात, जातीत, पंथात न बांधता त्यांनी दाखवलेल्या मार्गाने मार्गक्र मण करणे त्यांच्या विचारांशी बांधीलकी असणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल, असे प्रा. जावेद शेख म्हणाले.
पिंपळगाव बसवंत : महापुरु षांना विशिष्ट धर्मात, जातीत, पंथात न बांधता त्यांनी दाखवलेल्या मार्गाने मार्गक्र मण करणे त्यांच्या विचारांशी बांधीलकी असणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल, असे प्रा. जावेद शेख म्हणाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ विभाग व कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पिंपळगाव ब. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्ञान-विज्ञान वाचन चळवळ व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी प्रा. शेख बोलत होते. व्यासपीठावर डॉ. योगेश बस्ते, डॉ. शरद बिन्नोर, डॉ. जितेंद्र साळी, प्रा. चित्ररेखा जोंधळे, केंद्र कार्यवाह प्रा. नारायण शिंदे उपस्थित होते.
महात्मा फुले समग्र खंड य. दि. फडके लिखित ग्रंथाचे ग्रंथ अन्वेषण करताना ते म्हणाले की, महात्मा फुले यांचे साहित्य सर्वांनी वाचून, समजून घेतले तर आजच्या काळातील अनेक समस्या सुटतील. शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ शेतकºयांनी समजून घेतला तर शेतकरी आत्महत्या होणार नाही कारण फुलेंनी मांजरीजवळ २०० एकर जमीन विकत घेऊन शेती केली व शेतमाल निर्यात केला. त्यानंतर त्यांनी हा ग्रंथ लिहिला. महात्मा फुले यांनी एक हजार ओळींचा आधुनिक पोवाडा शिवाजी महाराजांवर लिहिला. त्यांची समाधी शोधून काढली. पहिली शिवजयंती साजरी केली.
शिवाजी महाराज हे कुळवाडीभूषण होते ते कुणब्यांचे, सर्वसामान्य रयतेचे राजे होते. असे फुलेंनी आपल्या ग्रंथातून सांगितले. सत्यशोधक समाजाच्या विचारांचा अंगीकार करून फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. स्री प्रसूती केंद्र आपल्या घरात स्थापन केले. सावित्रीबाई फुले यांनी ३४ बाळंतपणे केली. त्यामुळे महापुरु षांना समजून घ्यायचे असेल तर त्यांचे स्रीविषयक विचार समजून घेतले पाहिजे.
व्याख्यानमालेचे संयोजन व प्रास्ताविक केंद्र कार्यवाह प्रा. नारायण शिंदे यांनी केले. यावेळी त्यांनी व्याख्यानमालेची गरज व उद्देश स्पष्ट केले. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या डॉ. एस.एस. घुमरे यांचे मार्गदर्शन लाभले. आभार प्रदर्शन प्रा. सीताराम निकम यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. ज्ञानोबा ढगे यांनी केले.