गळफास घेऊन युवतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 11:46 PM2019-10-11T23:46:54+5:302019-10-12T00:32:27+5:30
तरु णीने राहत्या घरात फॅनला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत सुरेश पुंजा लोहरे यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
इगतपुरी : तरु णीने राहत्या घरात फॅनला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत सुरेश पुंजा लोहरे यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बुधवारी (दि. ९) मुंबई-आग्रा महामार्गाजवळील चंद्रभागा २ या सोसायटीत राहणाऱ्या रेखा सुरेश लोहरे (२०) हिने राहत्या घरात गळफास घेत जीवनयात्रा संपविली. इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. तरुणीने आत्महत्या का केली याचे कारण अजून समजू शकले नाही. या प्रकरणी इगतपुरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून मुक्तता
लासलगाव : येवला तालुक्यातील मुखेड येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपातून नितीन संजय शिंदे याची निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. मुखेड येथील फिर्यादी अल्पवयीन मुलीने २४ सप्टेंबर २०१४ रोजी येवला तालुका पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित नितीन संजय शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सदर खटल्याची सुनावणी होऊन सरकारी पक्षातर्फे६ साक्षीदार तपासण्यात आले. सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी आरोपी नितीन शिंदे याची निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फेनिफाड येथील ज्येष्ठ वकील अॅड. अरविंद बडवर व अॅड. सविता बडवर यांनी काम पाहिले.
महिलेसह पुरुषाचीही
सोनसाखळी ओरबाडली
नाशिक : म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली असून, पोलिसांच्या गस्तीविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. गुरुवारी (दि.१०) शहरात राष्टÑपती दौºयावर असताना सर्वत्र चोख बंदोबस्त व सतर्कतेचा इशारा आयुक्तालय हद्दीत असताना सकाळ, संध्याकाळ सोनसाखळी चोरीच्या दोन घटना म्हसरूळ पोलीस ठाण्यात घडल्या. चोरट्यांनी या घटनांमध्ये साडेतीन तोळे सोने लुटून पोलिसांना आव्हान दिले आहे. गुरुवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमाराला पहिली घटना घडली. मेरी परिसरातील हरिकृपा सोसायटी नर्मदा बंगला येथे राहणारे मधुकर पवार (७२) या ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून धूम ठोकली. पवार हे प्रवेशद्वारावर वाहनाची काच पुसत असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुण थांबले. त्यांनी पवार यांना बोलण्यात गुंतवून गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोनसाखळी ओरबाडून काळ्या रंगाच्या
पल्सर दुचाकीवरून पोबारा
केल्याचे फिर्यादीत पवार यांनी म्हटले आहे.