तरुणीचा मोबाइल खेचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 12:04 AM2018-08-04T00:04:14+5:302018-08-04T00:20:51+5:30
नाशिक : पायी जात असलेल्या तरुणीच्या हातातील मोबाइल दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़ २) रात्रीच्या सुमारास पंचवटीतील मधुबन कॉलनीत घडली़
नाशिक : पायी जात असलेल्या तरुणीच्या हातातील मोबाइल दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़ २) रात्रीच्या सुमारास पंचवटीतील मधुबन कॉलनीत घडली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेजस्विनी धामणे (रा़ द्रोणगिरी हौसिंग सोसायटी) ही तरुणी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास मधुबन कॉलनीतील अॅक्सिस बँकेच्या एटीएमसमोरून मोबाइलवर बोलत पायी जात होती. यावेळी तिच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा संशयितांनी तिच्या हातातील चौदा हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाइल चोरून नेला. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
गंजमाळच्या जुगार अड्ड्यावर छापा
गंजमाळ परिसरातील पंचशीलनगरमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुरुवारी (दि़ २) सायंकाळी भद्रकाली पोलिसांनी छापा टाकला़ यामध्ये तीन जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ पंचशीलनगरमध्ये असलेल्या शाळा क्रमांक ६ जवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला असता संशयित इम्रान शब्बीर शेख (३०, रा. खडकाळी), शाबीर शब्बीर शेख (२९, रा. कसाई वाडा, वडाळा नाका) व श्याम गेंदालाल कुरील (३८, रा. पंचशीलनगर, गंजमाळ) हे तिघे अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत होते़ त्यांच्याकडून दोन हजार १७० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले़ या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
महिलेची रोकड लंपास
महिलेच्या हातातील प्लॅस्टिक पिशवीला ब्लेड मारून त्यातील १२ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि़ २) दुपारच्या सुमारास पंचवटीतील मार्के ट यार्ड परिसरात घडली. दिंडोरी नाक्यावरील दत्तप्रसाद सोसायटीतील रहिवासी मीना रेवर या मार्केट यार्डाजवळ लसूण खरेदी करीत होत्या़ यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या प्लॅस्टिकच्या पिशवीतील रोकड व पासबुक चोरून नेले़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.