कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 00:30 IST2021-04-28T23:05:01+5:302021-04-29T00:30:50+5:30
नाशिक : गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कल चौकातून मार्गस्थ होणाऱ्या दुचाकीवरील तरुणीला एका भरधाव कारने धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार आशिका अशोककुमार जैन (२१) ही जखमी झाली.

कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणी जखमी
नाशिक : गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कल चौकातून मार्गस्थ होणाऱ्या दुचाकीवरील तरुणीला एका भरधाव कारने धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार आशिका अशोककुमार जैन (२१) ही जखमी झाली.
सोमवारी (दि. २६) आशिका ही तिच्या मोपेड गाडीने (एमएच १५ जीडी २४९७) नवरचना शाळेजवळून सावरकर नगर येथून प्रसाद सर्कलमार्गे जात असताना दुचाकीला भरधाव आलेल्या नेक्सा कार (एमएच १५ जीएफ ७६६३)च्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत धडक दिली. यामुळे आशिका रस्त्यावर कोसळून जखमी झाली. तिचे वडील अशोककुमार जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात कारचालक संशयित जयवंत पिसोळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.