जेलरोड येथे युवकाचा निर्घृण खून

By admin | Published: March 9, 2017 01:45 AM2017-03-09T01:45:26+5:302017-03-09T01:45:38+5:30

नाशिकरोड : जेलरोड लोखंडे मळा येथील संतोष ऊर्फ पप्पू यादव पाटील (३८) या युवकाचा पंचक सायट्रिक कंपनी मागील मोकळ्या मैदानात डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली.

Younger's bloodless murder at Jail Road | जेलरोड येथे युवकाचा निर्घृण खून

जेलरोड येथे युवकाचा निर्घृण खून

Next

नाशिकरोड : जेलरोड लोखंडे मळा येथील संतोष ऊर्फ पप्पू यादव पाटील (३८) या युवकाचा पंचक सायट्रिक कंपनी मागील मोकळ्या मैदानात डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली.
मयत इसमाची ओळख पटली असून तो जेलरोड लोखंडे मळा येथील हनुमंतानगर येथे राहत असल्याचे निष्पन्न झाले. आई-वडिलांसह राहणारा संतोष घरात भांडण करून बाहेर निघून गेला होता. बुधवारी सकाळी त्याचा खून झाल्याची बाब उघडकीस आली.
संतोष ऊर्फ पप्पू पाटील याच्या डोक्यात सीमेंट कॉँक्रीटचा दगड घालून रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पंचक सायट्रिक कंपनीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत निंबाजी बाबा मंदिराजवळ बुधवारी सकाळी आढळून आला.
सदर घटनेची माहिती पोलिसांना कळविताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. आर. ढोकणे, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश मजगर आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. मयताच्या डोक्यात सीमेंट कॉँक्रीटचा दगड घातल्याने त्यांचा चेहरा एका बाजूने छिन्नविछिन्न झालेला होता. त्यामुळे प्रारंभी मयताची ओळख पटविणे पोलिसांना अवघड झाले होते. पोलिसांनी काही मद्य विक्रेत्यांची चौकशी केल्यानंतर त्याचा घरचा पत्ता मिळाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष याचा अज्ञात इसमांनी गळा आवळून अज्ञात ठिकाणी खून केला असावा आणि त्यानंतर संशयितांनी त्याचा मृतदेह दुचाकी अथवा इतर वाहनाने सायट्रिक कंपनीमागे आणून त्याची ओळख पटू नये म्हणून त्याच्या डोक्यात सीमेंट कॉँक्रीटचा दगड घातल्याचा संशय आहे. पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकास पाचारण केले असता त्याने राजराजेश्वरी पुढील बालाजीनगरपर्यंत मार्ग काढला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मयत संतोषची बहीण मनीषा विनायक पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार संतोष ऊर्फ पप्पू यादव पाटील (वय ३८) या युवकाला
दारूचे व्यसन होते. त्याची पत्नी मुलीसह अडीच वर्षापूर्वी माहेरी निघून गेली आहे. तर त्याचा
लहान भाऊ राजू यादव पाटील (वय ३०) हा सहा महिन्यांपूर्वीच कुठेतरी निघून गेला आहे. संतोष पाटील याची बहीण त्याच्या घरापासून जवळच राहते. मंगळवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास संतोष याने वडिलांशी वाद घालून धक्काबुक्की केली होती.
यावेळी आई भांडण सोडविण्यास आली असता तिलादेखील संतोषने मारहाण केली. त्यानंतर तो आई-वडिलांकडून १०० रुपये घेऊन घरातून बाहेर निघून गेला. कुठलाही कामधंदा करत नसलेला संतोष दारूच्या व्यसनामुळे आई-वडिलांना सतत मारहाण करून सतत पैसे मागायचा. (प्रतिनिधी)

Web Title: Younger's bloodless murder at Jail Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.