एकाच दिवशी तेरा स्वच्छता कर्मचारी गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:20 AM2019-03-19T01:20:17+5:302019-03-19T01:20:38+5:30
प्रभाग क्र मांक ३० मध्ये एकाच दिवशी तेरा स्वच्छता कर्मचारी गैरहजर असल्यामुळे प्रभागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला.
इंदिरानगर : प्रभाग क्र मांक ३० मध्ये एकाच दिवशी तेरा स्वच्छता कर्मचारी गैरहजर असल्यामुळे प्रभागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला. प्रभाग क्र मांक तीसमध्ये राजीवनगर, इंदिरानगर, श्रद्धा विहार कॉलनी, सार्थकनगर, कलानगर, वडाळागाव, पांडव नगरी, बजरंग कॉलनी, राजसारथी यांसह परिसर येतो. प्रभागातील फक्त मुख्य रस्ते स्वच्छ केले जात असून, अंतर्गत रस्त्यावर सफाई कर्मचारी फिरकत नाही. त्यामुळे अंतर्गत रस्त्यावर स्वच्छतेअभावी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रभागातील नागरिकांनी नगरसेवकांकडे अंतर्गत रस्ते स्वच्छ होत नसल्याची तक्र ार केली असता सोमवारी (दि. १८) प्रभागाचे नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी स्वच्छता अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता सात कर्मचारी अर्ज देऊन रजेवर तर सहा कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण तेरा स्वच्छता कर्मचारी नसल्यामुळे परिसरातील अनेक रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य दिसून आले. ज्या सहा कर्मचाऱ्यांनी दांडी मारली त्यांच्यावर काय कारवाई होणार, असा प्रश्न करण्यात येत आहे.
परिसरातील अनेक रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य दिसून आले. प्रभागात स्वच्छतेची कामे करणाºया सात कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी रजा कशी दिली? आणि ज्या सहा कर्मचाºयांनी दांडी मारली त्यांच्यावर काय कारवाई होणार ? असा प्रश्न करण्यात येत आहे.