आपली लोकसंस्कृती पुढच्या पिढीत व्हावी संक्रमित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:11 AM2021-06-28T04:11:22+5:302021-06-28T04:11:22+5:30
नाशिक : मराठी संस्कृतीचे संगोपन होऊन आपली लोकसंस्कृती पुढच्या पिढीत संक्रमित व्हावी. आपल्या जगण्याची पाळेमुळे आपल्या संस्कृतीत आहेत. ...
नाशिक : मराठी संस्कृतीचे संगोपन होऊन आपली लोकसंस्कृती पुढच्या पिढीत संक्रमित व्हावी. आपल्या जगण्याची पाळेमुळे आपल्या संस्कृतीत आहेत. त्यामुळे मोठ्या सांस्कृतिक संस्थेने दुसऱ्या सांस्कृतिक संस्थांना पाठबळ देत, संस्कृतीच्या संवर्धनात योगदान द्यावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी, निर्माते अशोक हांडेयांनी केले. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाइन मुलाखतीत ते बोलत होते. महाराष्ट्राची संस्कृती सातासमुद्रापार नेणारे हांडे यांची मुलाखत श्रीमती ज्योती आंबेकर यांनी घेतली. या मुलाखतीत हांडे म्हणाले की, लोकसंस्कृती ही आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचे मूळ आहे. तिचे संगोपन आणि संवर्धन होणे गरजेचे असून, ती जपत पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्या संस्कृतीच्या दर्शन घडवणाऱ्या संस्थांनाही जीवित ठेवले पाहिजे त्यांना आर्थिक मानसिक असे पाठबळ द्यायला हवे हे सांगताना ते गेली अनेक वर्ष महाराष्ट्राची लोकधारा संपूर्ण महाराष्ट्रभर सादर करीत आहेत त्या लोकधारेतील अनेक घटना त्यांनी अधोरेखित केल्या. या कार्यक्रमात स्वागत, प्रास्ताविक गिरीश नातू यांनी केले. अशोक हांडे व ज्योती आंबेकर यांचा परिचय जयप्रकाश जातेगावकर यांनी करून दिला. आभार प्रदर्शन उदय मुंगी यांनी केले. यावेळी डॉक्टर वेदश्री थिगळे यांनी लोकसंस्कृतीसंदर्भात काही प्रश्न विचारले. शंकर बोराडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. गिरीश नातू, संजय करंजकर यांनी आभार मानले. संदीप नगरकर यांनी या ऑनलाइन मुलाखतीची तांत्रिक बाजू सांभाळली.
इन्फो
समाजातील सजग व्यक्तींची जबाबदारी
महाराष्ट्र संस्कृती जपण्याच्या प्रवासाला, इतर संस्कृतींना, संस्कृतीविषयक कार्यक्रम सादर करणाऱ्या कलावंतांना आर्थिक पाठबळ देण्याच्या कार्याला आणि पुढच्या पिढीपर्यंत ही लोकधारा टिकवून ठेवण्याच्या प्रवासाला बोलके केले. लोकसंस्कृती, लोकसाहित्य आपल्या संस्कृतीतली श्लोक, वाङ्मय आणि एकूणच मराठी साहित्य प्रवाही ठेवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी समाजातील सजग घटकालाच पार पाडावी लागणार असल्याचे हांडे यांनी नमूद केले. या मुलाखतीत अशोक हांडे यांचा नातू याने ही त्याची कला सादर केले.
फोटो
२७हांडे