टोळक्याकडून युवकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:18 AM2020-02-22T00:18:21+5:302020-02-22T01:16:16+5:30

जुन्या वादातून टोळक्याने एका युवकास धारदार शस्त्राने वार करीत जखमी केल्याची घटना अशोकस्तंभ परिसरात घडली. या घटनेत युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Youth attacked by gangs | टोळक्याकडून युवकावर हल्ला

टोळक्याकडून युवकावर हल्ला

Next

नाशिक : जुन्या वादातून टोळक्याने एका युवकास धारदार शस्त्राने वार करीत जखमी केल्याची घटना अशोकस्तंभ परिसरात घडली. या घटनेत युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
सुरज अहिरे, किरण साताळे आणि गणेश लहू (रा. नाशिक) असे युवकावर हल्ला करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. या घटनेत मंगेश रामचंद्र भीमनाथ या युवकावर हल्ला करण्यात आला असून, याप्रकरणी त्याचा भाऊ गिरीश रामचंद्र भीमनाथ (रा. मल्हारखान झोपडपट्टी) याने तक्रार दाखल केली आहे. शिवजयंतीच्या दिवशी बुधवारी रात्री घारपुरे घाट परिसरात ही घटना घडली. संशयित टोळक्याने मंगेश भीमनाथ यास गाठून जुन्या वादातून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आला आहे. दरम्यान, या मारहाणीची माहिती गिरीश भीमनाथ यास मिळाल्याने त्याने तातडीने धाव घेत आपल्या भावास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, अधिक तपास उपनिरीक्षक कोल्हे करीत आहेत.
सिडकोत महिलेची पोत खेचली
रस्त्याने पायी जाणाºया महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना सिडकोतील त्रिमूतीचौकपरिसरात घडली. कल्पना इश्वर शेळके (वय ३७, रा.भगतसिंग चौक, पवननगर) यांनी याप्रकरणी अंबड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कल्पना शेळके या गुरुवारी (दि.२०) त्रिमूर्ती चौकातील काम आटोपून उत्तमनगरच्या दिशेने पायी जात असताना जीएसटी भवनसमोर विरुद्ध दिशेने (क्रमांक एमएच १५ केपी १०९८) या दुचाकीवर आलेल्या भामट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे मंगळसूत्र ओरबाडून पोबारा केला. अधिक तपास सहायक निरीक्षक कोल्हे करीत आहेत.
दोन महिलांची आत्महत्या
शहर परिसरात महिलांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असून, गुरुवारी (दि. २०) वेगवेगळ्या ठिकाणी दोन विवाहितांनी आत्महत्या केली. त्यातील एकीने गळफास लावून, तर दुसरीने इमारतीवरून उडी घेत जीवनयात्रा संपविली. दोघा महिलांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
कांचन अर्जुन ढापसे (वय २४, रा.हरिओम सोसा., गुरुगोविंद सिंग कॉलेजमागे) व शालिनी दिलीप चव्हाण (वय २२, रा.दौलत मेडिकलजवळ, क्रांतिनगर) अशी आत्महत्या करणाºया विवाहितांची नावे आहेत. कांचन ढापसे यांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात कारणातून राहत्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेतली होती. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना मखमलाबादरोडवरील क्रांतिनगर भागात घडली. शालिनी चव्हाण या विवाहितेने गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील किचनच्या दरवाज्यास असलेल्या पिलरला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तपोवनातील डेंटल कॉलेज परिसरात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे पावणेचार लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकड व सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी हर्षल विजय गायकवाड (रा.द्वारकेश हाइट््स) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गायकवाड कुटुंबीय गुरुवारी (दि.२०) सकाळी काही कामानिमित्त घराबाहेर पडले असता चोरट्यांनी संधी साधत त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे लॅच लॉक उघडून कपाटातील रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे ३ लाख ८७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास आडगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक तोडकर करीत आहेत.

Web Title: Youth attacked by gangs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.