येवल्यात महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्त्या

By admin | Published: July 21, 2016 12:25 AM2016-07-21T00:25:18+5:302016-07-21T00:27:17+5:30

येवल्यात महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्त्या

Youth college college girl suicide | येवल्यात महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्त्या

येवल्यात महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्त्या

Next

 येवला : तालुक्यातील बाभूळगाव येथील एस. एन. डी महाविद्यालयात डिप्लोमाच्या प्रथम वर्षात शिकत असलेली पल्लवी बाळासाहेब ढोमसे (१७) हिने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी येवला शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेची माहिती वसतिगृहाच्या गृहपाल (रेक्टर) डॉ. मंगल बोराडे यांनी पोलिसांना दिली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात घाईने शवविच्छेदन केल्यानंतर मयत पल्लवीचा मृतदेह तिच्या गावी नेण्यात आला. मृत्यूच्या कारणाबाबत प्राथमिक संदिग्धता निर्माण झाल्याने नातेवाइकांनी कारण कळाल्याशिवाय व संबंधितांवर कारवाई झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने पंचकेश्वर येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मंगळवारी रात्री उशिरा या युवतीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
येवला ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक अहवालात मयत पल्लवीचा अंत गळफास घेतल्याने झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली आहे. व्हिसेरा तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याचे म्हटले आहे.
पल्लवीचे नातेवाईक येवला शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले असता त्यांची मनमाड पोलीस उपअधीक्षक राहुल खाडे, शहर पोलीस निरीक्षक संजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक विश्वास निंबाळकर यांच्याशी याबाबत चर्चा झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पल्लवीने आत्महत्त्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे,
मला येथे करमत नसल्यामुळे मी फाशी घेत आहे. आणि मला जगण्याची इच्छा राहिली नाही. माझ्या फाशीला मीच दोषी आहे. कृपया मला
माफ करा, मला जगयाचे नाही.
मी गेल्यानंतर मम्मी पप्पा तुम्ही स्वत:ला सावरा. माझी आठवण
काढू नका’ असे म्हटले आहे. आत्महत्त्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीबाबत काही शंका असेल तर पुणे येथील हस्ताक्षरतज्ज्ञांकडे चिठ्ठीमधील अक्षराची पडताळणी करता येऊ शकेल, असे पोलिसांनी पल्लवीच्या नातेवाइकांना सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Youth college college girl suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.