मैत्रिणीकडून लग्नास नकार; ‘प्रपोज डे’लाच प्रियकराने संपवली जीवनयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 06:57 AM2021-02-10T06:57:37+5:302021-02-10T06:57:57+5:30

नाशिकच्या इंदिरानगरमधील घटना; परिसरात हळहळ

youth commits suicide after his girlfriend refuses to marry him | मैत्रिणीकडून लग्नास नकार; ‘प्रपोज डे’लाच प्रियकराने संपवली जीवनयात्रा

मैत्रिणीकडून लग्नास नकार; ‘प्रपोज डे’लाच प्रियकराने संपवली जीवनयात्रा

Next

नाशिक : ‘व्हॅलेंटाइन वीक’ एकीकडे सुरू असताना या प्रेमाच्या सप्ताहात ‘प्रपोज डे’लाच एका प्रियकराने आपल्या मैत्रिणीकडून लग्नास नकार मिळाल्यामुळे गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना इंदिरानगर भागात घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

राजसारथी सोसायटीमध्ये भाडेतत्त्वावर राहणारा उच्चशिक्षित युवक अजय अनिल थोरात (२५) याने मैत्रिणीला प्रेम असल्याचे सांगत लग्नाची मागणी घातली; मात्र तिच्याकडून लग्नाला नकार मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून अजय याने राहत्या घरात छताच्या पंख्याला दोरी बांधून गळफास घेत जीवन संपविले. सोमवारी घटना उघडकीस आली.

अजयचा रूम पार्टनर किरण हा कामानिमित्त घराबाहेर गेलेला असताना अजय याने तो येण्यापूर्वीच गळफास घेतला. जेव्हा किरण हा दुपारी घरी आला तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्याने दरवाजा ठोठावला तसेच अजयच्या मोबाइलवर वारंवार संपर्कही केला; मात्र कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. पोलिसांनी वरच्या मजल्यावर जाऊन खिडकीतून डोकावले असता अजयने गळफास घेतल्याचे लक्षात आले.

Web Title: youth commits suicide after his girlfriend refuses to marry him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.