दुष्काळी परिस्थितीबाबत युवक कॉँग्रेसचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 11:57 PM2018-10-25T23:57:43+5:302018-10-26T00:01:06+5:30
सिन्नर : तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करणे, पशुधन वाचविणे, पशू लसीकरण व जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करणे आदींसह विविध ...
सिन्नर : तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करणे, पशुधन वाचविणे, पशू लसीकरण व जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करणे आदींसह विविध मागण्यांचे निवेदन तालुका युवक कॉँँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाला देण्यात आले.
सिन्नर तालुका युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष भाऊसाहेब शेळके यांच्या नेतृत्वाखाली युवक कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. व्ही. डी. गर्जे यांची भेट घेऊन निवेदन दिले. तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी निवेदनात केली आहे. चारा छावण्या सुरू करण्यासाठी पशुगणना आवश्यक असल्याने ती त्वरित करण्याचीही मागणी केली आहे. चारा छावण्या सुरू करताना पशुसंख्या लक्षात घेऊन चारा उपलब्ध केला जातो. यावेळी दिनेश चोथवे, तालुका उपाध्यक्ष पवन मुठाळ, रोहन कातकाडे, अतुल पडोळ, आकाश घोलप, सचिन आव्हाड, सचिन शेवाळे, यशश्री शिरोडे उपस्थित होते.सध्या पशुगणनेची उपलब्ध आकडेवारी ही मागील काही वर्षांतील आहे. त्यामुळे नवीन पशुगणना होणे महत्त्वाचे आहे. तसेच तालुक्यातील जनावरांचे लसीकरण व्हावे, तालुक्यातील रिक्त असलेल्या पशुवैद्यकीय अधिकाºयांच्या रिक्त जागा भरण्यात याव्या आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. पशुधन वाचविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सर्वतोपरी सहकार्य करावे, अशी मागणीही शेळके यांनी निवेदनात केली आहे.