निफाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची युवक काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 05:17 PM2018-10-25T17:17:44+5:302018-10-25T17:20:31+5:30

निफाड : यावर्षी पावसाने दडी मारल्याने निफाड तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा तसेच वाढती महागाई कमी करावी या इतर मागण्याचे निवेदन निफाड तालुका युवक कॉग्रेसच्या वतीने निफाडचे नायब तहसीलदार योगेश शिंदे यांना देण्यात आले.

Youth Congress demand to declare Nifad taluka drought | निफाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची युवक काँग्रेसची मागणी

निफाडचे नायब तहसीलदार शिंदे यांना निवेदन देताना सचिन खडताळे, मधुकर शेलार, विनायक शिंदे, सुहास सुरळीकर, सुनिल निकाळे, राजेंद्र बागडे, अक्षय कासव, शशी जाधव, श्रीकांत जाधव, सदाशिव भंडारे, विकास खडताळे, सतिश भालेराव, संग्राम ढकोलीया, राहुल पवार, निखिल निकाळे, कुणाल साळवे, कुणाल मोरे, राज परदेशी, निलेश धनराळे आदी.

Next
ठळक मुद्देयुवक कॉग्रेसच्या वतीने निफाडचे नायब तहसीलदार योगेश शिंदे यांना देण्यात आले.

निफाड : यावर्षी पावसाने दडी मारल्याने निफाड तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा तसेच वाढती महागाई कमी करावी या इतर मागण्याचे निवेदन निफाड तालुका युवक कॉग्रेसच्या वतीने निफाडचे नायब तहसीलदार योगेश शिंदे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, निफाड तालुका हा सधन तालुका म्हणून ओळखला जात असला तरी यावर्षी तालुक्यात पुरेशा प्रमाणात पाऊस पडला नसल्याने यंदा दुष्काळचे सावट मोट्या प्रमाणावर उभे राहिलेले आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पाणी टंचाई मोट्या प्रमाणात भेडसावत आहे. तालुक्यात आताच भूजल पातळी खूप खाली गेली आहे. बर्याच ठिकाणी विहीर, कुपनलिकांचे पाणी आटले पाणी आहे. त्यात जनावरांसाठी चार्याचा प्रश्न हा खुप गंभीर झाला आहे. त्यात शासनाकडून फक्त योजनचा भिडमार होत आहे. शेतमालाला हमीभाव नाही, पेट्रोल, डिजेल व गॅसच्या वाढत्या किमती यामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहे. त्यात वाढती बेरोजगारी हा प्रश्न खुप बिकट होत चालला आहे. राज्यात दिवसेंदिवस बेरोजगार्ंच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ होत आहे.निफाड तालुका हा दुष्काळी जाहिर करु न आवश्यक त्या गावांना पाण्याचे टॅकर आणी चारा छावण्या लवकरात लवकर सुरु करण्यात याव्या. मुंबई येथील कॉंग्रेस कार्यकर्ता मनोज दूबे यांची काही समाज कंटकानी हत्या घडवून आणली, त्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा निफाड तालुका युवक कॉंग्रस, तर्फे तिव्र स्वरु पात आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन निफाडचे नायब तहसीलदार योगेश शिंदे यांना देण्यात आले. याप्रसंगी निफाडतालुका युवक कॉग्रेसचे अध्यक्ष सचिन खडताळे, निफाड तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष मधुकर शेलार, जिल्हा सरचिटणीस विनायक शिंदे, तालुका सरचिटणीस सुहास सुरळीकर, सुनिल निकाळे, राजेंद्र बागडे, ओझर शहर युवक कॉग्रेसचे अध्यक्ष अक्षय कासव, शशी जाधव, श्रीकांत जाधव, सदाशिव भंडारे, विकास खडताळे, सतिश भालेराव, संग्राम ढकोलीया, राहुल पवार, निखिल निकाळे, कुणाल साळवे, कुणाल मोरे, राज परदेशी, निलेश धनराळे, गोकुळ निकाळे आदी उपस्थीत होते.
 

Web Title: Youth Congress demand to declare Nifad taluka drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.