...गावकीच्या पाणीटंचाईशी तरुणांचा सामना ! -दिलासा- श्रमदानातून काढला विहिरीतील गाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:12 AM2021-05-17T04:12:26+5:302021-05-17T04:12:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पेठ : गत दीड वर्षापासून तालुक्यातील जनता कोरोनाची लढाई लढत असताना मे महिन्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईने घातलेली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : गत दीड वर्षापासून तालुक्यातील जनता कोरोनाची लढाई लढत असताना मे महिन्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईने घातलेली भर लक्षात घेऊन जुनोठीपैकी सातपुते पाडा व उस्थळेपैकी फणस पाडा येथील तरुण युवकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या सहकार्याने श्रमदान करून गावकीच्या विहिरीतील गाळ काढून संभाव्य पाणीटंचाईच्या झळांवर घातलेली फुंकर कोरोनाच्या संकटातही नागरिकांना दिलासा देणारी ठरली आहे.
सातपुते पाड्यावर विहिरीची स्वच्छता जुनोठी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या सातपुते पाडा येथील सार्वजनिक विहिरीत गाळ साचल्याने टँकरने टाकलेले गढूळ पाणी नागरिकांना प्यावे लागत होते. सोशल नेटवर्किंग फोरमचे येथील ग्रामसमन्वयक व जलपरिषदमित्र गणेश सातपुते यांनी गावातील तरुणांना एकत्र करून विहिरीचा गाळ काढण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण विहिरीचा गाळ काढून ती स्वच्छ केली. आता ग्रामपंचायतीमार्फत याच विहिरीत टाकलेले पाणी ग्रामस्थांची तहान भागवत आहे. या कामात गणेश सातपुते, वैभव सातपुते, राहुल राउत, नीलेश राऊत, किशोर सातपुते, चंद्रकांत भोये, पंकज भोये, जगदीश सातपुते, जितेंद्र सातपुते, कमलेश सातपुते, कलाबाई सातपुते, लक्ष्मीबाई सातपुते, शीतल भोये, ठकूबाई सातपुते, कृष्णा सातपुते, मनोज भोये, लखन गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.
फणस पाडा येथील विहिरीचा काढला गाळ
तालुक्यातील उस्थळे ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या फणस पाडा येथे विहिरीत गाळ साचल्याने पाण्याची पातळी खाली गेल्याने ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत होते. येथील सोशल नेटवर्किंग फोरमचे ग्राम समन्वयक गोवर्धन गावंढे यांनी गावातील देवीदास पवार, मुरलीधर वाघेरे, रमेश राऊत, सुभाष वाघेरे, विष्णू गावंढे, मोहन चौधरी, जगन भुसारे, मोतीराम पवार, ओमकार चौधरी, रवींद्र कुभार यांना सोबत घेऊन विहिरीचा गाळ काढण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतकडून पंपाची व्यवस्था करून तरुणांनी श्रमदानाने विहिरीतील गाळ काढून खोलीकरण केल्याने नागरिकांना पाणीटंचाईपासून दिलासा दिला.
===Photopath===
160521\img-20210516-wa0027.jpg~160521\img-20210516-wa0043.jpg
===Caption===
सातपुते पाडा ता. पेठ~फणस पाडा