मुक्त विद्यापीठात आज युवक महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:17 AM2017-10-31T00:17:49+5:302017-10-31T00:17:55+5:30
शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने मंगळवार, दि. ३१ रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या मुख्यलयात होणाºया या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री नेहा जोशी यांच्या हस्ते होणार आहे, तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन राहणार आहेत.
नाशिक : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने मंगळवार, दि. ३१ रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या मुख्यलयात होणाºया या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री नेहा जोशी यांच्या हस्ते होणार आहे, तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन राहणार आहेत. मुक्त विद्यापीठाची महाराष्टÑात एकूण आठ विभागीय केंद्रे आहेत. या विभागीय केंद्रांतर्गत हा महोत्सव आयोजित केला जातो. विभागीय पातळीवरील स्पर्र्धांमध्ये प्रथम क्रमांकाने निवड झालेल्या विद्यार्थी कलावंतांचा केंद्रीय युवक महोत्सव विद्यापीठाचे नाशिक येथील मुख्यालयात घेतला जातो. एकांकिका, मूक अभिनय, विडंबन नाट्य, गायन, वादन, चित्रकला, रांगोळी, फोटोग्राफी, वादविवाद, नृत्य, वक्तृत्व आणि प्रश्नमंजूषा अशी विविध प्रकारांतील १८ प्रकारात महाराष्टÑातील १४० विद्यार्थी सहभागी होऊन आपले कलाविष्कार सादर करणार आहेत.