सैन्य भरतीसाठी गुजरात, दीव-दमण येथील तरुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 01:18 AM2019-11-02T01:18:28+5:302019-11-02T01:19:12+5:30
लष्कराच्या ६३ जागांच्या भरतीसाठी गेल्या तीन दिवसांपासून देवळाली येथे भरती प्रक्रि या सुरू आहे. शुक्रवारी (दि.१) सैनिक पदाच्या भरतीप्रक्रियेसाठी पाचशे ते सहाशे तरु ण दाखल झाले होते.
देवळाली कॅम्प : लष्कराच्या ६३ जागांच्या भरतीसाठी गेल्या तीन दिवसांपासून देवळाली येथे भरती प्रक्रि या सुरू आहे. शुक्रवारी (दि.१) सैनिक पदाच्या भरतीप्रक्रियेसाठी पाचशे ते सहाशे तरु ण दाखल झाले होते.
येथील आनंद रोड मैदानावर शुक्रवारी सकाळी गुजरात, दादरा-नगरहवेली व दिव-दमण या भागातील तरु णांची भरती प्रक्रि या राबविण्यात आली; मात्र त्यास पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद न लाभल्याने केवळ ५०० तरु ण दाखल झाले. त्यांच्यापैकी काहींना कागदपत्रे अपूर्ण असल्याने माघारी यावे लागले. टीएच्या मैदानापर्यंत केवळ ३१० तरु ण दाखल झाले. त्यानंतर या प्रक्रि येत प्रत्येक ठिकाणी बाद होणाऱ्या उमेदवारांच्या हाताला लाल रंग लावून बाहेर काढण्यात येत होते. शनिवारी (दि.२) आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातील तरुणांकरिता भरतीप्रक्रि या होणार आहे.
यावेळी देवळालीतील गुरुद्वाराच्या वतीने शम्मी आनंद, प्रकाश लखवानी व झुलेलाल मंदिर ट्रस्टच्या वतीने अमित रोहेरा, सिंधी पंचायतीच्या वतीने रतन चावला, मन्नू माखिजा आदींनी युवकांच्या चहा, नाश्त्यासह जेवणाची सोय करण्यात आली होती. भरती दरम्यान लष्करी पोलीस व देवळाली कॅम्प पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला असून, कॅन्टोन्मेंटच्या आरोग्य विभागामार्फत दररोज रस्ते व मैदानाची सफाई केली जात आहे. लष्कराच्या भरतीसाठी गुरुवारी राजस्थान येथून पाच हजार युवकांनी सहभाग नोंदविला. पहाटे ५ वाजेच्या सुमारास भरतीप्रक्रि येला सुरु वात झाली. कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. भरती मैदानाकडे ५० ते १०० गटाने तरुणांना टप्प्याटप्प्याने सोडण्यात आले.