बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी

By admin | Published: November 15, 2016 01:31 AM2016-11-15T01:31:30+5:302016-11-15T01:37:14+5:30

शिंगवे : पिंंजरा लावण्याची मागणी

Youth injured in leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी

Next

सायखेडा : निफाड तालुक्यातील शिंगवे येथील सायखेडा-करंजगाव रस्त्यालगत राहत असलेल्या शहाजी डेर्ले यांच्या वस्तीवर त्यांचे बंधू अजय डेर्ले यांच्यावर रविवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान बिबट्याने हल्ला केला. त्यात डेर्ले जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
परिसरातील रहिवाशांनी बिबट्या बघितल्याने त्यांनी अजय डेर्ले यांना दुध्वनीव्दारे मदतीसाठी बोलावले. डेर्ले घरातून बाहेर जात असतांना शेजारी असलेल्या मोकळ्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या मांडीला चावा घेतला.
डेर्ले यांनी आरडा-ओरड केल्यानंतर बिबट्या पसार झाला. गेल्या दोन दिवसांपूर्वीच दारणासांगवी येथेही बिबट्याने सुनील साळवे यांच्या घराच्या मागे असलेल्या गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करीत वासरु फस्त केले. याठिकाणी वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक विजय लोंढे यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. गोदाकाठ परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. (वार्ताहर)

Web Title: Youth injured in leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.