विनयभंगप्रकरणी युवकास वर्षभराचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:15 AM2021-03-21T04:15:17+5:302021-03-21T04:15:17+5:30
गंगापुररोड पोलीस ठाणे हद्दीतील सातपुरजवळील ध्रुवनगर भागात २९ एप्रिल २०१८साली संध्याकाळच्या साडेसात वाजेच्या सुमारास आरोपी देसले याने पीडितेच्या घरात ...
गंगापुररोड पोलीस ठाणे हद्दीतील सातपुरजवळील ध्रुवनगर भागात २९ एप्रिल २०१८साली संध्याकाळच्या साडेसात वाजेच्या सुमारास आरोपी देसले याने पीडितेच्या घरात बळजबरीने प्रवेश करत तीचा हात धरुन अश्लील कृत्य करत विनयभंग केला होता. त्याच्याविरुध्द पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार गंगापुर पोेलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पीडितेची बदनामी होईल असे संदेश व्हॉटसऍप तसेच फेसबुक या सोशल माध्यंमामध्ये पसरविण्याचे कृत्यही देसले याने केल्याचे पिडितेने पोलिसांना सांगितले.
तत्कालीन महिला पोलीस उपनिरिक्षक एन. टी. सुर्यवंशी यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करत सबळ पुरावे जमा करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी
अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एस. के. ढेकळे यांच्या न्यायालयात सुरू होती. सरकारी वकिल म्हणुन एस.एच. सोनवणे व राजेंद्र सुर्यवंशी यांनी बाजू मांडली. त्यांनी न्यायालयासमारे सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारावर न्यायायाने देसले यास दोषी ठरवत विनयभंग प्रकरणी एक वर्षाचा सश्रम कारावास व २ हजार रूपये दंड, लैंगिक छळ या कलमाखाली १ वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रूपये दंड व यासाठी गुन्हेगारी धाक दाखवल्याच्या गुन्ह्यासाठी ६ महिने सश्रम कारावास व ५०० रूपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्व शिक्षा एकत्र भोगाव्या लागणार आहेत. तर एकुण दंड ४ हजार ५०० रूपये सुनावण्यात आला आहे.