वैतरणा धरणात युवक बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 01:57 AM2019-06-14T01:57:23+5:302019-06-14T01:58:28+5:30
मुंबई येथून पर्यटनासाठी आलेल्या परिवारातील दोन युवक आळवंडी वैतरणा धरणात बुडाल्याची घटना गुरुवारी (दि. १३) दुपारी ४ वाजता घडली. यातील एक युवक बचावला असून, धरणात बेपत्ता युवकाचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
घोटी : मुंबई येथून पर्यटनासाठी आलेल्या परिवारातील दोन युवक आळवंडी वैतरणा धरणात बुडाल्याची घटना गुरुवारी (दि. १३) दुपारी ४ वाजता घडली. यातील एक युवक बचावला असून, धरणात बेपत्ता युवकाचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
मुंबईच्या गोरेगाव भागातील चौधरी परिवारातील सदस्य वैतरणा धरण भागात पर्यटनासाठी आले होते. नदीला स्विच वॉलद्वारे २० वर्षात पहिल्यांदा पाणी सोडण्यात आले. दोघा युवकांना वाहत्या पाण्यात उतरण्याचा मोह झाला. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही जण बुडू लागले. दोघांपैकी निखिल चौधरी (२२) हा युवक पाण्यात बुडाला. दुसरा युवक कसाबसा पाण्याच्या बाहेर आल्याने बचावला. त्याचे नाव बाळा असल्याचे सांगितले जाते. पर्यटकांत १० ते १५ जण असल्याचे समजते. र्याबाबतची माहिती मिळताच स्थानिक मच्छीमारांनी बुडालेल्या युवकाचा पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश मिळू शकले नाही. अंधार पडल्याने रात्री उशिरा शोधकार्य थांबवण्यात आले.