जिल्हा माहेश्वरी समाजातर्फे युवक-युवती परिचय संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 01:11 AM2018-10-22T01:11:32+5:302018-10-22T01:12:19+5:30

आर्टिलरी सेंटररोड येथील संत आनंदऋषी शाळेच्या प्रांगणात नाशिकरोड नगर माहेश्वरी सभा व महेश सेवा समिती नाशिकरोड यांच्या वतीने या परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

Youth-Maiden Introduction Meeting by District Maheswari Samaj | जिल्हा माहेश्वरी समाजातर्फे युवक-युवती परिचय संमेलन

नाशिक जिल्हा माहेश्वरी विवाहयोग्य युवक-युवती परिचय संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करताना धनराज दायमा. समवेत माहेश्वरी सभा व महेश सेवा समितीचे पदाधिकारी.

Next

नाशिकरोड : आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या लोकांनी कोणताही बडेजाव न करता साध्या पद्धतीने विवाह केल्यास सर्वसामान्य लोक त्यांचे अनुकरण करतील, त्यातून समाजात विवाहाबाबत आदर्श निर्माण होईल, असे प्रतिपादन माजी पोलीस उपायुक्त धनराज दायमा यांनी केले. नाशिक जिल्हा माहेश्वरी विवाहयोग्य युवक-युवती परिचय संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी दायमा बोलत होते.
आर्टिलरी सेंटररोड येथील संत आनंदऋषी शाळेच्या प्रांगणात नाशिकरोड नगर माहेश्वरी सभा व महेश सेवा समिती नाशिकरोड यांच्या वतीने या परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘सकल वैवाहिक रिश्ते ही हमारा लक्ष्य हैं’ या विषयावर मार्गदर्शन करताना दायमा म्हणाले की, जीवनचक्रात प्रत्येक जण सुखी, आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतो. यामध्ये विवाह हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, वैवाहिक जीवन सुखी असेल तरच प्रत्येक जण सुखी आनंदी राहू शकतो.
विवाहयोग्य युवक-युवती परिचय संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी भगवान श्री महेश यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे उपाध्यक्ष अशोक बंग, प्रदेश उपाध्यक्ष रामविलास बूब, उद्योजक वसंत राठी, जिल्हाध्यक्ष उमेश मुंदडा, अमर कलंत्री, रामविलास लोहिया, प्रकाश लढ्ढा, किशोर राठी, मधुसूदन काबरा, रामविलास राठी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विवाहयोग्य युवक-युवती परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. माहेश्वरी सभा नाशिकरोड अध्यक्ष श्रीनिवास लोया यांनी स्वागत केले.
दिल मिलाई जमविणे गरजेचे
लग्न ठरविताना कुंडली जमविण्यापेक्षा दिल मिलाई जमविणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे लग्न ठरविताना कुठल्याही प्रकारची माहिती न लपविता दोन्ही कुटुंबाने व मुला-मुलीने एकमेकांना पारदर्शकपणे सर्व काही स्पष्टपणे सांगितले पाहिजे. जेणेकरून भविष्यात अडचण निर्माण होणार नाही, असेही दायमा यांनी स्पष्ट केले.

Web Title: Youth-Maiden Introduction Meeting by District Maheswari Samaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.