किरकोळ कारणावरून सातपूरला युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 01:34 AM2018-12-18T01:34:21+5:302018-12-18T01:34:46+5:30

दुचाकीतील पेट्रोल संपल्याने मित्रांना फोन करून सांगितलेले पेट्रोल उशिरा आणल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून एकावर वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी (दि़१६) मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीतील सिएट कंपनीजवळ घडली़

The youth murdered in Satpur due to minor reasons | किरकोळ कारणावरून सातपूरला युवकाचा खून

किरकोळ कारणावरून सातपूरला युवकाचा खून

Next

नाशिक : दुचाकीतील पेट्रोल संपल्याने मित्रांना फोन करून सांगितलेले पेट्रोल उशिरा आणल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून एकावर वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी (दि़१६) मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीतील सिएट कंपनीजवळ घडली़ अमोल अशोक बागले (२३, शिवाजीनगर, सातपूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे़ या प्रकरणी सातपूर पोलीस खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे़  सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बागले दुचाकीवरून घरी परतत असताना सिएट कंपनीजवळ त्याच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. त्यामुळे त्याने मित्र संशयित सुनील पंडित खरात (२१), लोकेश अशोक थोरात (१८), किरण मधुकर बिन्नर (१९, तिघेही रा़ साईबाबानगर चौक, सातपूर) यांना फोन करून पेट्रोल आणण्यास सांगितले़ त्यानुसार तिघेही पेट्रोल घेऊन गेले मात्र त्यांना येण्यास उशीर का झाला या कारणावरून अमोल बागले याने शिवीगाळ केली व एकाच्या कानशिलातही लगावली़
या प्रकारामुळे तिघाही संशयित मित्रांनी अमोल बागले यास जबर मारहाण केली. तर एकाने धारदार हत्यार काढून पोटात भोसकले. यानंतर या तिघांनी त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात प्रथम जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ मात्र सोमवारी पहाटेच्या सुमारास अमोल बागले याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता़

Web Title: The youth murdered in Satpur due to minor reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.