कुसुमाग्रज संगीत स्पर्धेमध्ये युवा गायकांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:04 AM2019-09-29T00:04:11+5:302019-09-29T00:04:27+5:30
कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित राज्य पातळीवरील शास्त्रीय गायन स्पर्धेला आज सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेचे परीक्षक पं. शंकर वैरागकर आणि पं. अविराज तायडे यांच्या हस्ते झाले.
नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित राज्य पातळीवरील शास्त्रीय गायन स्पर्धेला आज सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेचे परीक्षक पं. शंकर वैरागकर आणि पं. अविराज तायडे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून तीस युवा गायक कलावंतांनी सहभाग नोंदवला आहे.
शनिवारी या स्पर्धेस प्रारंभ झाल्यानंतर एकूण नऊ कलावंतांनी सादरीकरण केले. त्यात सावनी गोगटे (राग शुद्धसारंग), आदिती कोरटकर (राग छायानट), केदार जोशी (मुलतानी), आर्या मुळे (गोरख कल्याण), गणेश पाडळकर (दुर्गा), गीतांजली हराळ (तोडी), भक्ती पवार (पुरिया कल्याण), अरु ण चितळे (नंदकौस) आणि सिद्धार्थ निकम (कलावती) असे राग सादर करून रसिकांना विविध घराण्यांच्या गायकीचा आस्वाद दिला. कार्यक्र मात अॅड. विलास लोणारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. स्पर्धेत तबला साथसंगत नितीन पवार, नितीन वारे, सुजित काळे यांनी तर संवादिनी संगत आनंद अत्रे, सागर कुलकर्णी यांनी केली. स्पर्धेसाठी लोकेश शेवडे, आशिष रानडे, दीपक घरापुरकर, दिलीप रत्नपारखी हे उपस्थित होते. रविवारी सकाळी १० वाजता स्पर्धेतील पुढील स्पर्धकांच्या गायनाला प्रारंभ होणार आहे.