व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स बदलून युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 01:01 AM2019-01-20T01:01:41+5:302019-01-20T01:01:56+5:30

सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे वीस वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. १९) सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

 Youth suicide by changing Whatsapp's status | व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स बदलून युवकाची आत्महत्या

व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स बदलून युवकाची आत्महत्या

Next
ठळक मुद्दे‘घेतला ना भो अखेरचा निरोप’

सिन्नर : तालुक्यातील पंचाळे येथे वीस वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. १९) सकाळी
७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
पंचाळे येथील संदीप साहेबराव सैंद्रे या युवकाने बाभळीच्या झाडाला गळफास घेतल्याचे सकाळी आढळून आले. पंचाळे गावापासून एक किलोमीटर अंतरावर भोकणी रस्त्यालगत सैंद्रे यांचे घर आहे. संदीप एसवायबीएपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याने दोन वर्षापूर्वी फायर सेफ्टीचा कोर्स केला होता. सध्या तो एक वर्षापासून मुसळगावच्या सहकारी औद्योगिक वसाहतीतील रिंग गिअर्स या कारखान्यात काम करीत होता.
शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता ड्यूटी संपवून संदीप घरी आला. सायंकाळी त्याने गावातील आठवडे बाजारातून भाजीपाला घेतला. रात्री
९ वाजता जेवण करून झोपी गेला. शनिवारच्या मध्यरात्री केव्हातरी
उठून त्याने आत्महत्या केल्याचे समजते.
घरापासून सुमारे हजार फूट अंतरावर असलेल्या बाभळीच्या वाळलेल्या झाडाच्या वीस फूट उंचीच्या फांदीला तार व दोरी बांधून गळ्यात अडकून फांदीवरून स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. सकाळी ७ वाजेच्या सुमारास भाऊ गणेश सैंद्रे याने कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. पोलीसपाटील रवींद्र जगताप यांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची खबर दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. सिन्नर नगर परिषद रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी पंचाळे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संदीप याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राम भवर अधिक तपास करीत आहेत.
स्टेट्स पाहून नातेवाइक, मित्रांना धक्का
संदीप याने रात्री आपल्या व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेट्स बदलले. ‘घेतला ना भो अखेरचा निरोप’ असे स्टेट्स टाकून त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजते. सकाळी मित्र व ग्रामस्थांनी संदीपच्या आत्महत्येची बातमी समजली तेव्हा त्याचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स पाहिल्यानंतर सर्वांना धक्का बसला. सकाळी कुटुंबातील सदस्यांना घरात संदीप दिसत नसल्याने शोधाशोध सुरू केली. तेव्हा आत्महत्याचा प्रकार उघडकीस आला.

Web Title:  Youth suicide by changing Whatsapp's status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.