टाकळीरोड येथे युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:56 IST2020-01-12T23:46:31+5:302020-01-13T00:56:28+5:30
टाकळीरोड खोडदेनगर येथील इच्छापूर्ती गणेश मंदिरासमोर राहणारे राजेंद्र दौलतराव कुमावत (४९) यांनी शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या पूर्वी राहत्या घरात आढाच्या पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.

टाकळीरोड येथे युवकाची आत्महत्या
नाशिकरोड : टाकळीरोड खोडदेनगर येथील इच्छापूर्ती गणेश मंदिरासमोर राहणारे राजेंद्र दौलतराव कुमावत (४९) यांनी शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या पूर्वी राहत्या घरात आढाच्या पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नसून उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गोरेवाडी येथे
दुचाकीची चोरी
नाशिकरोड : गोरेवाडी येथे राहणारा आकाश बाबू साळवे याची ६० हजार रुपये किमतीची रॉयल इनफील्ड बुलेट (एमएच १५ ईआर ७२६३) ही दुरुस्ती करण्यासाठी मित्र सागर लक्ष्मण गोसावी रा. अनुसयानगर खर्जुल मळा याच्याकडे गेल्या शुक्रवारी दिली होती. गोसावी याने सदर बुलेट घराजवळ व्यवस्थित लावली असतांना रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.