प्री- वेडिंग शूटसाठी तरुणाईचा ग्रामीण भागाकडे कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 03:29 PM2020-12-23T15:29:22+5:302020-12-23T15:32:09+5:30
देवगांव : लग्नाच्या गोड आठवणींचा सोहळा आठवणीच्या स्वरुपात जपण्यासाठी कॅमेर्यात कैद केला जातो. परंतु हल्लीच्या जमाना फास्ट झाल्याने लग्नापूर्वीच्या आठवणीदेखील कॅमेर्यात बंदिस्त करण्यासाठी नवा पर्याय प्री-वेडिंग शूटची पध्दत सुरु झाली आहे.
देवगांव : लग्नाच्या गोड आठवणींचा सोहळा आठवणीच्या स्वरुपात जपण्यासाठी कॅमेर्यात कैद केला जातो. परंतु हल्लीच्या जमाना फास्ट झाल्याने लग्नापूर्वीच्या आठवणीदेखील कॅमेर्यात बंदिस्त करण्यासाठी नवा पर्याय प्री-वेडिंग शूटची पध्दत सुरु झाली आहे.
या प्री- वेडिंगसाठी तरुणाईकडून ग्रामीण भागातील परीसराला पसंती दिली जावू लागली आहे. देवगांव परिसरातील वैतरणा धरणाच्या निसर्गरम्य ठिकाणी अशा फोटोग्राफीला वाव मिळत आहे.
कारोनाच्या परिस्थितीमुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे लग्नसराईचा गत हंगाम ठप्प झाला होता. याकाळात छोटेखानी लग्नसोहळे पार पडताना दिसले. परंतु आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असताना आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असलेल्या विवाह समारंभाबाबत तरुणाईचा उत्साह वाढला आहे.
कोरोनोमुळे संपूर्ण जग बदलून गेले आहे. विवाह सोहळ्याच्या पद्धती बदलल्या आहेत. कमी लोकांच्या उपस्थितीत विवाह संपन्न होत असल्याने खर्चात मोठी बचत होत आहे. त्यामुळे वधुवरांची ह्यप्री वेडिंगह्ण फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंगला पसंती वाढली आहे.
शहरी भागातील वधुवरांकडून फोटोग्राफी व शूटिंगसाठी ग्रामीण भागातील शेती, नदी, नाले, तळे आणि पुरातन महाल व वाडे यांच्या लोकेशनला जास्त पसंती दिली जात आहे. तसेच, पुरातन महाल व वाड्यांनाही पसंती दिली जाते. काहींना ग्रामीण भागातील शेतातील पिकांमध्ये फोटोग्राफी करायला आवडते. त्यामुळे सध्याच्या मंदीच्या काळातही खासगी मालकी असलेल्या महाल व राजवाडे मालकांना आणि ग्रामीण भागातील रिसोर्टला चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.
सध्या विवाह सोहळा एका विधीपुरता मर्यादित न राहता, लग्नाच्या आधीच्या क्षणांचा आनंद साठवून ठेवण्याकडे तरुणाईचा कल दिसून येत आहे. भावी वधू-वराच्या पहिल्या भेटीपासून ते एकमेकांच्या विवाह सोहळ्यापर्यंतचे सर्व क्षण पुन्हा अनुभवून साठवण्यासाठी प्री-वेडिंग शूट केले जात आहे. म्हणजेच लग्न ठरल्यावर दोघे पहिल्यांदा कधी भेटले, कुठे भेटले, लग्नासाठी कुणी पहिल्यांदा विचारले? यासारख्या आठवणी कॅमेर्यात साठवल्या जात आहेत. त्यामुळे पहिल्या भेटीपासून ते लग्न ठरण्यापर्यंतचा प्रवास कॅमेर्यामध्ये बंदिस्त करण्याचा पर्याय तरुणाईने निवडला आहे.
प्री-वेडिंग काय असतं?
या शूटवेळी फोटो फ्रेम्स, फुगे, छत्री, बाईक, सायकल, गाडी तसेच लग्नाची तारीख लिहिलेल्या पाट्या असे विविध प्रॉप्स वापरले जातात. फोटो काढत असताना त्याचे चित्रीकरणही केले जाते. ज्याचे रूपांतर ह्यप्री-वेडिंगह्ण व्हिडिओमध्ये होते. प्री -वेडिंगच्या माध्यमातून जोडपे एकमेकांना अधिक ओळखू लागतात, असे सांगितले जाते.
धरण किनाऱ्यावर प्री- वेडिंग फोटोग्राफी करतांना जोडपे.