नाशकात पेट्रोल डिझेल दर वाढीविरोधात "युथ वॉक"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 03:26 PM2018-09-08T15:26:48+5:302018-09-08T15:31:26+5:30
पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्याच्या आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारने मागील चार वर्षांत साततत्याने इंधनाच्या दरांमध्ये वाढ केल्याचा अरोप करीत नाशिक शहरातील तरुणांनी शनिवारी (दि. ७) ‘युथ वॉक’ करीत सरकारविरोधात निषेध नोंदवला. यावेळी तरुणांनी ‘शेतीमालाचे भाव वाढवा, पेट्रोल डिझेलचे नाही’, सरकार तेरा अनोखा खेल, ‘डेटा सस्ता महेंगा तेल’ आदी घोषणांचे फलक हातात घेऊन सरकारविरोधात रोष व्यक्त केला.
नाशिक : पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्याच्या आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारने मागील चार वर्षांत साततत्याने इंधनाच्या दरांमध्ये वाढ केल्याचा अरोप करीत नाशिक शहरातील तरुणांनी शनिवारी (दि. ७) ‘युथ वॉक’ करीत सरकारविरोधात निषेध नोंदवला. यावेळी तरुणांनी ‘शेतीमालाचे भाव वाढवा, पेट्रोल डिझेलचे नाही’, सरकार तेरा अनोखा खेल, ‘डेटा सस्ता महेंगा तेल’ आदी घोषणांचे फलक हातात घेऊन सरकारविरोधात रोष व्यक्त केला.
पेट्रोल व डिझेलच्या किमतीत सातत्याने होणाºया वाढीचा नाशिकच्या तरुणांनी कॅनडा कॉर्नरपासून ते भोसला मिलिटरी स्कूलच्या प्रवेशद्वारापर्यंत पायी फेरी काढून विरोध केला. फेरीत विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे प्रतिनिधी व शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील तरुणांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेत इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केले. आधीच बेरोजगारीच्या संकटाचा सामना करणाºया देशातील तरुणांना शिक्षण आणि नोकरीच्या शोधात बाहेर पडावे लागते. त्यात केंद्रातील भाजपाचे सरकार सातत्याने इंधनाची दरवाढ करून तरुणांच्या अडचणीत वाढ करीत आहे. इंधन दरवाढीमुळे अन्य जीवनावश्यक वस्तुंच्याही किमती वाढत असून, या महागाईचा विरोध करण्यासाठी शहरातील तरुणांनी एकत्र येत सरकारचा निषेध केला. यावेळी विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या तरुणांनी पक्षीय ओळख बाजूला ठेवून युथ वॉकमध्ये सहभाग घेतला. यात भूषण काळे, समाधान भारतीय, सुरेश नखाते, विश्वास वाघ, प्रफुल्ल वाघ, विक्रम गायधनी, योगेश कापसे, स्वप्नील घिया, अमोल गोरडे, यश बच्छाव, यश बच्छाव सुनित शर्मा, अक्षय ठोके, आकाश कोकाटे, राकेश जाधव, सागर निकम, तल्हा शेख, सिद्धांत बर्वे, प्रशांत खैरे आदींचा समावेश होता.