मखमलाबाद रोडला भर दुपारी युवकाचा वार करून खून
By संजय पाठक | Updated: October 13, 2023 19:22 IST2023-10-13T19:19:56+5:302023-10-13T19:22:00+5:30
पोलिसांनी या घटनेप्रकरणी चौघा जणांना ताब्यात घेतले आहे.

मखमलाबाद रोडला भर दुपारी युवकाचा वार करून खून
संदीप झिरवाळ, नाशिक- मखमलाबाद रस्त्यावर असलेल्या कवी कुसुमाग्रज उद्यान जवळ एका 22 वर्षीय युवकाचा चौघा मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी (दि.13) दुपारी अडीच वाजेच्या सुमाराला घडली आहे.
या घटनेत मखमलाबाद रोड परिसरात राहणाऱ्या सागर विष्णू शिंदे याचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी दुपारी सागर व त्याचे इतर चौघे मित्र यांच्यात पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून शाब्दिक बाचाबाची झाली व त्यानंतर चौघांनी सागर याच्या मानेवर तसेच चेहऱ्यावर काहीतरी धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला. पोलिसांनी या घटनेप्रकरणी चौघा जणांना ताब्यात घेतले आहे.