युवा सप्ताहातून युवकांच्या कलागुणांना वाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:13 AM2021-01-17T04:13:23+5:302021-01-17T04:13:23+5:30
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कर्मवीर वावरे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने महाविद्यालयात युवा सप्ताहाचे आयोजन ...
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कर्मवीर वावरे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने महाविद्यालयात युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून संचालक नाना महाले, प्राचार्य डॉ. ज्योत्स्ना सोनखासकर, हेमांगी पाटील, डॉ. मीनाक्षी गवळी, डॉ. दर्शन कोकाटे, प्रा. रविराज वटणे, प्रा. एस. टी. घुले, प्रा. दीपक दळवी उपस्थित होते. यावेळी नाना महाले यांनी युवावस्थेचे महत्त्व सांगताना युवाशक्तीचा उपयोग नेहमी विधायक कार्यासाठी करण्याचे व गरजेनुसार आर्थिक बचत करण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ.सोनखासकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मीनाक्षी गवळी यांनी राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताह आयोजनाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी हेमंत काळे, मीना गायकवाड, पूनम गोसावी या युवकांचा भरीव कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. एस.टी. घुले यांनी केले तर प्रा. दर्शन कोकाटे यांनी आीार मानले. यावेळी दीपक दळवी, गणपत गडाख, बापू बागुल, हेमंत काळे, प्रभाकर गांगुर्डे, वैभव खडांगळे, धनंजय कदम, ऋतिक पाटील, राहुल चौधरी, पुनम गोसावी, शिवानी मुळे आदी उपस्थित होते.