पंचशीलनगर युवक खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:11 PM2018-12-24T23:11:37+5:302018-12-24T23:11:41+5:30
नाशिक : मोबाइल मागितल्याच्या किरकोळ कारणावरून पंचशीलनगरमध्ये भाडेतत्त्वावर राहणाऱ्या तरुणावर कु-हाडीने वार करून खून करणारा आरोपी कैलास रामचंद्र शेजुळ (रा़ पंचशीलनगर, खंडोबा मंदिराजवळ, नाशिक, मूळ रा़ कळंबा महाली, ता़ जि़ वाशिम) यास जिल्हा न्यायाधीश एऩ जी़ गिमेकर यांनी सोमवारी (दि़२४) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़

भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील पंचशीलनगरमधील खंडोबा मंदिराजवळील रहिवासी हेमंत जगताप यांच्या खोलीमध्ये विशाल प्रकाश झाल्टे (मूळ रा़ धु्रवनगर, सातपूर, नाशिक) हा युवक भाडेतत्त्वावर राहात होता़ १० आॅगस्ट २०१७ रोजी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास विशाल झाल्टे याने कैलास शेजुळ याच्या घराचा दरवाजा वाजवून मोबाइल मागितल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला़ या कारणावरून आरोपी शेजुळ याने कु-हाडीने वार करून विशाल झाल्टे यास ठार मारले़ तसेच उपस्थितांना सदर प्रकार कोणास सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात आरोपी कैलास शेजुळ याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली होती़
भद्रकाली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस़ आऱ साबळे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ न्यायाधीश गिमेकर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील रवींद्र एल़ निकम यांनी आठ साक्षीदार तपासले़ त्यामध्ये दोघा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष व परिस्थितीजन्य पुरावा या आधारे आरोपी कैलास शेजुळ यास जन्मठेप व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली़