ऐतिहासिक दुर्ग संवर्धनासाठी सरसावले युवक
By Admin | Published: July 3, 2014 10:33 PM2014-07-03T22:33:26+5:302014-07-04T00:12:12+5:30
ऐतिहासिक दुर्ग संवर्धनासाठी सरसावले युवक
आनंद बोरा
नाशिक, दि. ०३ - महाराष्ट्राच्या सामर्थ्यशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले ऐतिहासिक दुर्ग, गड संवर्धनासाठी नाशिक जिल्ह्यातील युवकांनी एकत्र येत सिन्नर-घोटी रस्त्यावरील टाकेद येथील शिवाजी महाराजांच्या विश्रामगड (पट्टागड) कि ल्लयावर श्रमदान करून दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानची स्थापना केली. या प्रतिष्ठानाच्या वतीने विविध गड, किल्लयांच्या संवर्धनासाठी व त्यांचे सौंदर्याची जोपासणा करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. शिवरायांचे नाशिक जिल्ह्यात बरेच किल्ले आहेत. शिवरायांचा इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांचे संवर्धन व्हावे भावी पिढीला प्रत्यक्ष किल्ले बघता यावे या उद्देशाने नाशिक जिल्ह्यातील युवक एकित्रत आले व त्यांनी ‘दुर्ग संवर्धन प्रतिष्ठाण’ची स्थापना केली. सिन्नर-घोटी रोड वरील टाके द गावातील ज्या ठिकाणी शिवाजी राजे महिनाभर विश्रांती साठी थांबले होते. त्या विश्रामगडावर श्रमदान करून स्थापना करण्यात आली. या गडावरील आठ ते दहा पाण्याच्या कुं ड स्वच्छ करण्यात आले या मोहिमेत विजयकुमार घोटे, पप्पू जगताप, सागर घोलप, मनोज पगारे, अजित जगताप,सागर बनकर, गणेश जाधव, दर्शन घुगे, आशिष बनकर, पंढरी जाधव, मुरलीधर मेंघाल, नामदेव जाधव,विकी गोसावी,मयूर शिंदे, मयूर तुपे, संदीप घोटे यांनी सहभाग घेतला. दरम्यान काही पर्यटकांनी त्यांच्या मोहिमेला हातभार लावला....असा आहे विश्रामगड
या किल्ल्यावर जाण्यासाठी सिन्नर- ठाणगाव- वैतागवाडी-पट्टेवाडी या मार्गाने जाता येते. समुद्रसपाटी पासून हा किल्ला ४५६२ फुट उंचीवर आह.े विश्रामगडाच्या पायथ्याशी पटटेवाडी गाव आहे. त्यामुळे त्याला पट्टागड नाव पडले असावे. हा किल्ला लांब असून किल्ल्यावर गुहा आणि पाण्याच्या कुंड मोठ्या प्रमाणात आहे. गडाच्या पहिल्या टप्यात गड दैवत असलेले देवीचे मंदिर आहे. मंदिराजवळ पाण्याचे खोदीव टाके आहेत. किल्ल्याचे उत्तरद्वार आजही टिकून आहे. गडाच्या तटबंदी मोठया प्रमाणात पडझड झालेली दिसून येते. ...असा आहे इतिहास
या किल्ल्याचा उल्लेख रामायणात देखील वाचायला मिळतो. सीता मातेला जेव्हा रावणाने पळविले तेव्हा त्याचा प्रतिकार जटायु ने केला होता यावेळी जटायू घायाळ होवून या ठिकाणी पडला होता. त्यावेळी राम लक्ष्मण त्यास सर्वतीर्थ टाकेद येथे भेटले. जटायूचे वास्तव्य याच किल्ल्यावर होते. तर शिवरायांचा इतिहासात डोकावले असता युद्धांमुळे राजे थकले होते बिहर्जी नाईक जाधव हा गुप्तहेर खात्याचा प्रमुख होता त्यांनी राजेंना आडवाटेने पट्टे किल्ल्यावर आणले. या ठिकाणी राजे महिनाभर विश्रांतीला होते. म्हणून या किल्ल्याला विश्राम गड असे नाव पडले आहे. जेव्हा डोंगर बोलू लागतात...या पुस्तकात देखील या किल्लयाचा सखोल इतिहास वाचायला मिळतो.दुर्मिळ वृक्षसंपदेचे माहेरघर
या किल्ल्यावर शेकडो प्रकारची वृक्ष बघावयास मिळतात. वन विभागाने वृक्षारोपण देखील केले आहे. या परिसरात करवंदे, शिकेकाई, वाघाटीचे प्रकार, हिंगण बेट, बेरंगी बाभूळ, काटेसावर, शतावरी, कोरपड, घायापात, सागवान, बिजा, हळदू, शिवन, कळम, शिसम,खैर, मोह असे अनेक वृक्ष येथे आहेत. प्राणवायू देणारे पिंपळ, कादंब, बांबू, जैविक इंधन देणारे करंज, कडूनिंब वातावरणातील प्रदूषण रोखणारया उंबर, सीताफळ,जांभूळ, सप्तपर्णी, मोह, निम, पुत्रंजीवा, आंबा, चारोळी, तामण, पळस अशी वृक्षसंपदा येथे बघावयास मिळते....अशी आहे गड-किल्यांची ऊंची
* पट्टा किल्ला— ४५३२ फूट
*कळसुबाई- ५४००फूट,
*अलंग ४८५२ फूट,
*मदनगड-४८२१ फूट,
*कुलंग- ४८२२ फूट,
*औंढा-४३२९ फूट,
*हरिश्चंद गड ४६९१ फूट,
*रतनगड ४२५५ फूट,
*भैरवगड २८३५ फूट,
*कुंजर- ३६७० फूट उंचीचा आहे.