तरुणाई ऑनलाईन फादर्स डे च्या माध्यमातून व्यक्त करणार कृतज्ञता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 09:15 PM2020-06-20T21:15:00+5:302020-06-20T21:19:04+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामुहिक कार्यक्रमांना परवनागी नाही. त्यामुळे आजच्या पिढीतील हायटेक झालेली तरुणाई आपल्या जन्मदात्याविषयी रविवारी फेसबूक, टिकटॉक, इंस्टाग्राम सारख्या सोशल माध्यमांतून ऑनलाईन फादर्स डे साजरा करून कृतज्ञता व्यक्त करणार आहे.

Youth will express gratitude through online Father's Day | तरुणाई ऑनलाईन फादर्स डे च्या माध्यमातून व्यक्त करणार कृतज्ञता 

तरुणाई ऑनलाईन फादर्स डे च्या माध्यमातून व्यक्त करणार कृतज्ञता 

Next
ठळक मुद्देनाशिक शहरात फादर्स डे चा उत्साह तरुणाई सोशल मिडियावर ऑनलाईन साजरा करणार फादर्स डेजूनच्या तिसऱ्या रविवारी झळकतील वडिलांसोबतचे जुने-नवे फोटो

नाशिक  : यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामुहिक कार्यक्रमांना परवनागी नाही. त्यामुळे आजच्या पिढीतील हायटेक झालेली तरुणाई आपल्या जन्मदात्याविषयी रविवारी (दि.२१)फेसबूक, टिकटॉक, इंस्टाग्राम सारख्या सोशल माध्यमांतून ऑनलाईन फादर्स डे साजरा करून कृतज्ञता व्यक्त करणार आहे. तर काही जणांनी घरातच राहून वडिलांसोबत दिवस घालविण्याचे नियोजन केले आहे. 
मुले आणि  वडीलांच्या नात्यातील महत्व अधोरेखीत करणारा फादर्स डे दरवर्षी जूनच्या तिसºया रविवारी साजरा करण्यात येतो. फादर्स डे साजरा करण्याविषयी विविध मतभेद असले तरी या दिवसाच्या निमित्ताने वडिलांप्रती नि:स्वार्थ प्रेम आणि सन्मान व्यक्त करता येते असे तरुणांचे मत आहे. त्यामुळेच तरुणाई सोशल मिडियाच्या माध्यमातून फादर्स डे चा उत्साह निश्चितच साजरा करणार आहे. दरवर्षी अनेक तरुण घरोघरी हा दिवस उत्साहात साजरा  करून वडिलांना आकर्षक भेट देतात. मात्र यावर्षी कोरोनाची भिती आणि लॉकडाऊनमुळे अनेकजण घरी राहून वडिलांसोबत वेळ घालवत मनमोकळ्या गप्पा मारण्याचा आनंद घेणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

Web Title: Youth will express gratitude through online Father's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.