विहिरीत पडल्याने युवक जखमी
By admin | Published: June 14, 2014 01:16 AM2014-06-14T01:16:58+5:302014-06-14T01:18:30+5:30
सुरगाणा : शासनाची उदासीनता, कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणा डोळेझाक याचा फटका कहांडोळसा (प) या भबाडा ग्रामपंचायतमधील एका युवकाच्या पाणीटंचाई हा विषय जिजावर बेतला आहे.
सुरगाणा : पावसाच्या माहेरघरी दुष्काळाचा वणवा या उक्तीप्रमाणे सुरगाणा तालुक्याला इगतपुरी बरोबरच पावसाचे माहेरघर समजले जाते, मात्र शासनाची उदासीनता, कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणा डोळेझाक याचा फटका कहांडोळसा (प) या भबाडा ग्रामपंचायतमधील एका युवकाच्या पाणीटंचाई हा विषय जिजावर बेतला आहे. पळसनजवळील उंच डोंगरावर असलेले कहांडोळ्या (प) या गावातील श्रीराम बाबजी वार्डे (४०) हा पहाटे गावालगत असलेल्या विहरीत ४ वाजेच्या सुमारास पाणी भरण्यास गेला असता एखाद्या हंडाभर पाणी विहरीच्या तळाला खडकावर साचले आहे का हे पाहुन विहरीच्या तळाला त्याला हंडाभर पाणी साचलेले दिसले. सुरुवातीस आपणच आलो आहोत त्यामुळे हंडाभर पाणी आपल्यालाच मिळेल या आशेने हंडा घेऊन विहिरीच्या कपशीला धरुन उतरत असताना तोल जाऊन हा युवक ५० फुट विव्वळ खडक असलेल्या विहरीत जाऊन पडला, हंडाभर पाणी मिळविण्यासाठी चाललेला जिवाचा आटापिटा त्याच्या चांगलाच जिवावर बेतला. सार्वजनिक असलेली विहीर कोरडीठाक असल्याने युवकाच्या कमरेला मणक्याला, पायाला गंभीर दु:खापत झाल्याने व नाकातोंडातून रक्त आल्याने उपचारासाठी पळसन आरोग्य केंद्रात दाखल करणेत आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले मात्र त्यास गंभीर दु:खापत झाल्याने त्यास जिल्हा ग्रामिण रुग्णालय नासिक येथे पुढील उपचारासाठी दाखल करणेत आले आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक महिन्यापूर्वी टँकरला प्रस्ताव पाठविला आहे. तरीदेखील अद्याप पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार केली आहे. हंडा घेऊन रानोमाळ पाणी शोधण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. तालुक्यात सधअया २५ गावे व १३ वाड्या, पाड्यांना १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे