दुर्गम हरिहर गडावर युवकांची चढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:12 AM2018-03-29T00:12:23+5:302018-03-29T00:12:23+5:30
महाराष्टतील सर्वात अवघड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्गम अशा हरिहर गडावर येथील छत्रे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी चढाई करत निसर्ग निरीक्षण गिरिभ्रमण व गिर्यारोहणाचा थरारक अनुभव घेतला.
मनमाड : महाराष्टतील सर्वात अवघड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्गम अशा हरिहर गडावर येथील छत्रे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी चढाई करत निसर्ग निरीक्षण गिरिभ्रमण व गिर्यारोहणाचा थरारक अनुभव घेतला. छत्रे विद्यालयातर्फे सलग तेराव्या वर्षी शालेय विद्यार्थ्यांमध्ये गिर्यारोहणाची व गिरिभ्रमणाची आवड निमार्ण व्हावी या हेतूने हरिहर गड दुर्गभ्रमंती मोहिमेचे आयोजन क्रीडाशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होेते. अतिशय दुर्गम श्रेणीतील हरिहर गड हा त्याच्या उभ्या चढणीच्या पायºयांसाठी प्रसिद्ध आहे. पाहताक्षणी मनात धडकी भरविणाºया या गडावर छत्रे विद्यालयाच्या सात मुली, दोन मुले, सहा शिक्षक व मनमाडमधील पाच गिरिप्रेमींनी हर्षवाडीतून दोन तासांच्या खड्या चढाईनंतर यशस्वी आरोहण करीत थरारक अनुभव घेतला. साक्षी शिंदे, प्रेरणा गायकवाड, गुंजन शिरसाठ, धनश्री बेदाडे, रश्मी खळे, सलोनी कुडाळ, आदिती बोरसे, प्रतीक पवार, ऋषिकेश हिरे या विद्यार्थ्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच दुर्गभ्रमंतीचा थरार अनुभवला. या मोहिमेत पंकज पाखले, अशोक भोये, सुमंत अंबर्डेकर, विश्राम पवार, ऋषभ शहा या शिक्षकांनी तसेच मनमाडमधील गिरिप्रेमी डॉ. भागवत दराडे, अमोल खरे, अनिल निरभवणे, नीलेश वाघ, प्रमोद अहिरे यांनी सहभागी होत दुर्गभ्रमंतीचा अनुभव घेतला. पर्यावरणाचा दृष्टिकोन सांभाळत एक आगळावेगळा अनुभव विद्यार्थ्यांनी या मोहिमेतून घेतला.