ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देत युवकांची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 01:15 PM2019-03-26T13:15:48+5:302019-03-26T13:15:56+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या ११२ सदस्यपदासह २४ थेट सरपंच पदांसाठी झालेल्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. यापूर्वी ३० पैकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या असून पाच जागांवर बिनविरोध थेट सरपंच निवडून आलेले आहेत.
घोटी : इगतपुरी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या ११२ सदस्यपदासह २४ थेट सरपंच पदांसाठी झालेल्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. यापूर्वी ३० पैकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या असून पाच जागांवर बिनविरोध थेट सरपंच निवडून आलेले आहेत. सर्व ग्रामपंचायतींत प्रथमच सरपंचपदाचे उमेदवार थेट जनतेतून निवडून आले. या निवडणुका पक्षीय चिन्हावर लढवल्या गेल्या नसल्याने कोणत्या पक्षाच्या ताब्यात गावाची सत्ता गेली याबाबत संभ्रमाचे चित्र आहे. असे असले तरी निकालाचा कल पाहिल्यास अनेक ग्रामपंचायतीत राजकीय उलथापालथ झाली आहे. मतमोजणीमध्ये अनेक दिग्गजांना आपली पत गमवावी लागली. तर काही दिग्गजांनी आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं. निकालानंतर ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष केला गेला. निकालानंतर कोठेही काही अनुचित घटना घडली नाही. ही निवडणूक पक्षीय चिन्हावर नसल्याने आता सर्वच पक्षांकडून यशाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. सरपंच पदाचे उमेदवार पक्षाचे चिन्ह न घेता प्रथमच जनतेतून निवडून आल्याने ग्रामपंचायतीवर सत्ता नेमकी कुणाची यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. यावरून भविष्यात ग्रामपंचायतींच्या कारभारात राजकीय रणकंदन अपेक्षति असले तरी मात्र सर्वत्र यशाचा जोरदार जल्लोष सुरू आहे.
इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी शांततेत पार पडली.
------------------------
समान मते पडल्याने चिठ्ठी पद्धतीने निवड
अधरवड येथील उमेश बर्हे, नवनाथ बर्हे यांना प्रत्येकी १८६ समान मते मिळाली. तर म्हसुर्ली येथील योगिता तांबे, पार्वताबाई भारस्कर यांनाही १६४ समान मते मिळाली. सोनोशी येथील माधवराव घाणे, दत्तू पेढेकर यांना समान ९४ मते मिळाली. यामुळे तहसीलदार वंदना खरमाळे यांच्या दालनात सर्वांच्या उपस्थितीत रसिका बोंडे, सई बºहे या मुलींनी चिठ्ठी काढली. यामध्ये अधरवड येथील उमेश बºहे यांची, म्हसुर्ली येथील योगिता तांबे, सोनोशी येथील दत्तू पेढेकर यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. पाडळी देशमुख येथील पूजा धांडे ह्या दोन ठिकाणी उभ्या होत्या. एका ठिकाणी त्यांना पराभव पत्करावा लागला. थेट सरपंच पदांमुळे सदस्यांतून सरपंच होण्याचे स्वप्न धुळीला मिळालेल्या विजयी उमेदवारांनी उपसरपंच होण्यासाठी नव्या सदस्यांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी योजना सुरू केली आहे.