जानोरी येथील युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 01:25 AM2018-12-17T01:25:54+5:302018-12-17T01:26:09+5:30

दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायत सदस्याच्या मुलाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि. १५) रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. कुणाल विष्णू सरनाईक असे मृत युवकाचे नाव आहे.

Youth's murder in Janori | जानोरी येथील युवकाचा खून

जानोरी येथील युवकाचा खून

Next

दिंडोरी : तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायत सदस्याच्या मुलाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि. १५) रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. कुणाल विष्णू सरनाईक असे मृत युवकाचे नाव आहे.
मयताची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता सदर युवक जानोरी येथील असल्याचे समजले. मयत युवकाच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. सदर युवक जानोरी ग्रामपंचायतच्या सदस्य संगीता सरनाईक यांचा मुलगा आहे. अधिक तपास दिंडोरीचे पोलीस निरीक्षक अनिल बोरसे करीत आहेत.
शनिवारी सायंकाळी
दोन ओळखीतील युवक कुणालच्या घरी आले. त्यांनी ओझर येथील यात्रेस जायचे आहे असे त्याच्या कुटुंबातील सदस्यांना सांगून कुणालला सोबत घेऊन गेले. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता शिवनई-म्हसरूळ रोडवर आंबेहिल डिफेन्स गेटच्या जवळ अज्ञात इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती शिवनईचे पोलीसपाटील पांडुरग गडकरी यांनी दिंडोरी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Web Title: Youth's murder in Janori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.