नाशिकमधील तरुणाईचे आवडते कट्टे बहरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 06:14 PM2018-08-04T18:14:40+5:302018-08-04T18:20:04+5:30

शहर व परिसरामधील तरुणाईचे कट्टे बहरणार आहे. बहुतांश मित्र-मैत्रिणींनी शहराजवळच्या पर्यटनस्थळांची अर्थात तरुण कट्टयांची निवड केली आहे.

The youths of Nashik will enjoy their favorite cartoons | नाशिकमधील तरुणाईचे आवडते कट्टे बहरणार

नाशिकमधील तरुणाईचे आवडते कट्टे बहरणार

googlenewsNext
ठळक मुद्देमैत्रदिनाचा आनंद अधिकाधिक द्विगुणित होणारसर्वत्र निसर्गरम्य वातावरण असून पावसाच्या रिमझिमधारा

नाशिक : सर्वत्र निसर्गरम्य वातावरण असून पावसाच्या रिमझिमधारा बरसण्यास पुन्हा सुरूवात झाली आहे. त्यामुळे मैत्रीदिनाचा आनंद अधिकाधिक द्विगुणित होणार आहे. शहर व परिसरामधील तरुणाईचे कट्टे बहरणार आहे. बहुतांश मित्र-मैत्रिणींनी शहराजवळच्या पर्यटनस्थळांची अर्थात तरुण कट्टयांची निवड केली आहे. यानिमित्त शहरातील तरुणाईच्या क ट्ट्यांविषयी थोडसं...

पांडवलेणी />नाशिक शहरापासून अवघ्या बोटावर मोजण्याइतक्या अंतरावर निसर्गरम्य वातावरणाची अनुभूती देणारे ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या पांडवलेणीलाही तरुणाईकडून पसंती दिली जाते. येथील उद्याने प्रशस्त असून निवांत निसर्गाच्या सानिध्यात मनमोकळ्या गप्पांचे फड रंगविण्यासाठी पांडवलेणी हक्काची जागा ठरते. पांडवलेणीच्या पायथ्याशी किंवा डोंगर चढून गेल्यानंतर तरुणाई दगडी लेण्यांमध्ये बसून गप्पा व फोटोसेशन करण्यावर भर देतात.

बॉटनिकल गार्डन
वनविकास महामंडळाच्या अखत्यारितीत असलेले पांडवलेणीच्या पायथ्याचे पंडीत जवाहरलाल नेहरू वनोउद्यान अर्थात बॉटनिकल गार्डनदेखील तरुणाईसह नाशिककरांच्या आवडीचे ठिकाण आहे. या उद्यानाचे नवनिर्माण झाल्यापासून येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढली आहे. पावसाळ्यामुळे येथील वृक्षसंपदा बहरली असून अवघे उद्यान हिरवाईने नटलेले आहे. उद्यानामध्ये बागडणारे विविध पक्ष्यांचा आवाज आल्हाददायक वातावरणातील जणू एक संगीत भासते. तरुणाई या ठिकाणालाही पसंती देते. आकर्षक फुलपाखरुच्या आकाराची बाके, बसण्यासाठी नैसर्गिकरित्या तयार करण्याच आलेल्या पॅगोडे, आशियन, आफ्रिकन हत्तींच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेतात.

अमृत वनोद्यान
नाशिक महापालिकेने साकारलेले मखमलाबाद शिवारातील तवली फाटा येथील अमृत वनोद्यान तरुणाईसाठी आगळेवेगळे नविन डेस्टिनेशन आहे. येथील इको फ्रेण्डली पॅगोडे, आकर्षक लॉन, वृक्षसंपदा लक्ष वेधून घेते. उद्यान प्रशस्त असल्याने मनमुरादपणे तरुणाईसह नाशिककर या ठिकाणी बागडताना दिसतात. महापालिके ने सुमारे साडे १७ एकर जागेत केंद्र शासनच्या अमृत योजनेतून हे उद्यान साकारण्यात आले आहे. उद्यान विकसित करताना अमृत योजनेच्या संकल्पनेनुसार कमीत कमी सिंमेंट कॉँक्रीटचा वापर करण्यावर भर दिला गेला आहे. या उद्यानामध्ये टकाऊ वस्तूंचा शोभेसाठी वापर केला गेला आहे.

दुधसागर धबधबा
गंगापूर गावाजवळील बालाजी मंदिर येथील दुधसागर धबधबा तरुणाईसह नाशिककरांचे आवडीचे अन् हक्काचे डेस्टिनेशन आहे. पावसाळ्याची चार महिने या ठिकाणी नाशिककरांची गर्दी असते. प्रत्येक नाशिककर तरुण-तरुणीने या धबधब्याजवळची सेल्फी क्लिक केलेली नसेल तर नवलचं. शहरापासून जवळ असलेल्या या पर्यटनस्थळावर जाण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले जाते.

Web Title: The youths of Nashik will enjoy their favorite cartoons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.