टपली मारल्याच्या रागातून युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:04 AM2018-02-12T01:04:45+5:302018-02-12T01:05:44+5:30
नाशिक : डोक्यात टपली मारल्याबद्दल जाब विचारल्याने रागातून मित्राने पोटात चाकूने वार केल्याने रुग्णालयात दाखल असलेल्या शिवाजीनगरमधील युवकाचा रविवारी (दि़११) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ बबन सोमा बेंडकुळे (२५, रा. यशोधन रोहाउस, सिद्धिविनायक मंदिराजवळ, शिवशक्ती चौक, शिवाजीनगर, सातपूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, दि. २९ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती़ या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी दोघा संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, एकास अटक तर दुसरा फरार आहे़

गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.डी़ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत बबन बेंडकुळे व संशयित आकाश सुरेश पवार (रा. शिवशक्ती चौक), तुषार दिनेश लांडे (२६) हे एकमेकांचे मित्र आहेत़ दि. २९ जानेवारी रोजी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास बेंडकुळे हा घराजवळून पायी जात असताना पल्सर दुचाकीवरून (एमएच १५, सीएक्स ०३५५) आलेले पवार व लांडे आले़ यापैकी पवार याने बेंडकुळेच्या डोक्यात टपली मारली असता, त्यास डोक्यात पाठीमागून टपली का मारली याचा बेंडकुळे याने जाब विचारला़ याचा राग आलेल्या लांडे याने बेंडकुळेचे हात धरले तर पवारने कमरेचा चाकू काढून पोटात खुपसला़