झाकीर हुसेन रूग्णालय अजूनही फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:16 AM2021-05-21T04:16:30+5:302021-05-21T04:16:30+5:30
नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात गेल्या महिन्यात ऑक्सिजन गळतीची दुर्घटना घडल्यानंतर येथे रूग्ण येण्यास धजावतील की नाही, ...
नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात गेल्या महिन्यात ऑक्सिजन गळतीची दुर्घटना घडल्यानंतर येथे रूग्ण येण्यास धजावतील की नाही, याविषयी शंका होती. मात्र, दुर्घटनेनंतर येथील २७ बेड रिकामे झाले आणि अवघ्या अर्ध्या तासात ते पुन्हा भरले. शहरातील अनेक रूग्णालये आणि खासगी रूग्णालयेदेखील आता मोकळी होऊ लागली असताना, झाकीर हुसेन रूग्णालयात मात्र आजही १६० रूग्ण दाखल आहेत. झाकीर हुसेन रूग्णालयात दुर्घटना घडल्यानंतर पाच रूग्णांना अन्यत्र तत्काळ स्थलांतरित करण्यात आले होते तर २२ रूग्णांना वाचविण्यात कर्मचाऱ्यांना अपयश आले. मात्र, त्यानंतरही रिक्त झालेले रूग्णालय तत्काळ भरले. त्यानंतर शहरातील रूग्णसंख्या कमी होऊ लागली आणि अन्यत्र खाटादेखील उपलब्ध हेाऊ लागल्या. महापालिकेच्या बिटको रूग्णालयात सुमारे नऊशे रूग्ण होते. त्यातील साडेचारशे खाटा आता रिक्त झाल्या आहेत. मात्र, त्यानंतरही बिटको रूग्णालयात अजूनही १६० रूग्ण उपचार घेत आहेत. मुळात या रूग्णालयात १५० इतकीच रूग्णांवर उपचाराची क्षमता आहे. त्यानंतरही दुर्घटना घडली तेव्हा याठिकाणी १५७ रूग्ण होते व आताही १६० रूग्ण उपचार घेत आहेत.